अतुल कोल्हे भद्रावती :-
सफाई कर्मचाऱ्यांचे हाल समजून प्रशासन व शासन यांच्यात समन्वय साधून न्याय करतात असे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार, यांचा सत्कार राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, भारत सरकारचे माजी सदस्य व भारतीय सुदर्शन समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप हाथीबेड यांच्या तर्फे शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. परमार हे तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते.
यावेळी रविभवन, नागपूर येथे सफाई कर्मचाऱ्यांची विभागीय आढावा बैठक पार पडली असुन समाज व सफाई कर्मचारी संघटना मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
राष्ट्रीय कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणीचा विस्तार करून अनेक नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. राष्ट्रीय पदाधिकारिंच्या सर्वानुमते मा. दिलीप हाथीबेड यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी तर बबलू गंगाखेडे यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
आयोजित तीन दिवसीय दौऱ्यात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष घनश्याम डकहा, महाराष्ट्र राज्य माजी सरचिटणीस संजय राजसेवाती, महाराष्ट्र राज्य माजी सचिव विक्की बढेल, गडचिरोली प्रभारी ओंकार बोहत, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ प्रदीप पाटील, प्रा. नागपूर शहर अध्यक्षा जितू मस्ते व नागपूर शहर महिला कार्यकारिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलीप हाथीबेड यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment