*नगरपरिषद भद्रावती पथविक्रेता समिती सदस्यांची निवडणूक बिनविरोध*

*नगरपरिषद भद्रावती पथविक्रेता समिती सदस्यांची निवडणूक बिनविरोध*

अतुल कोल्हे भद्रावती : 
                  भद्रावती नगर परिषद तर्फे घेण्यात आलेल्या पथविक्रेता समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत सर्वच सदस्य बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विशाखा शेळकी याच्या हस्ते दि. १० जुलैला नवनिर्वाचित सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या निवडणुकीत सर्वसाधारण खुला गटातुन रुपेश रत्नाकर दंडेलवार, सलाम बापुमीया शेख, वंदना संजय बेले (महीला राखीव), तर अनुसूचित जाती गटातून महेंद्र निंबाजी मेश्राम, इतर मागासवर्ग (महिला राखीव) आशा विठ्ठलराव तराळे, अल्पसंख्यांक गटातून जमील दड्डु शेख, तर दिव्यांग गटातून रविकांत भीवा पाझारे बिनविरोध निवडून आले आहे. अनुसूचित जमाती (महिला राखीव) गटातील पद रिक्त आहे. 


भद्रावती नगर परिषद, दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत प्रथविक्रेता अधिनियम २०१४ अन्वये भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील पथ विक्रेत्यांचे विनियमन व नियंत्रण करण्याकरिता नगर पथ विक्रेता समिती अनिवार्य आहे. सदर अधिनियम २०१४ अन्वये नगर पथ विक्रेता समितीत २० सदस्य असतील यामध्ये शासकीय विभाग व इतर मंडळे त्याच करीबी पथविक्रेत्यांचे ७ सदस्य असतील. हे पथ विक्रेत्यांचे ८ सदस्य नोंदणीकृत पथविक्रेत्यामधून निवडणुकीद्वारे घेण्याचे अधिनियम २०१४ मध्ये नमूद आहे. त्याचप्रमाणे नगर परिषद भद्रावती अंतर्गत १ जुलै २०२४ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सदर सदस्य निवडून आले आहेत. याप्रसंगी नगर परिषद उपमुख्याधिकारी जगदिश गायकवाड, शहर अभियान व्यवस्थापक ज्योती लालसरे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Comments