चंदनखेडा येथे सिकलसेल तपासणी**चंदनखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राने केले आयोजन*

*चंदनखेडा येथे सिकलसेल तपासणी*

*चंदनखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राने केले आयोजन*

अतुल कोल्हे भद्रावती :-
            शासकीय आदिवासी आश्रमशाळा, चंदनखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, चंदनखेडा च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, आरडीके तपासणी व सिकलसेल तपासणी करण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांची आरडीके निगेटिव्ह आढळली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना कीटकजन्य आजार, जलजन्य आजार व सिकलसेल आजारबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभवी तितरे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक रवींद्र सुटे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन नितीन मून यांनी केले.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  मदन सायंकार, अमोल मसराम, कल्याणी गाडगे, तुकाराम भोयर, शारदा सहारे , भारती उरकांडे, स्नेहा गजभिये, प्रवीण मडावी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी आरोग्य निरीक्षक अंकुश पंडिले, नंदकिशोर घाटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रामेश्वरी कोंडावार तथा  आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्या  उपस्थित होत्या.


Comments