सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास अटक करून, सोन्याचे दागिने जप्त केल्याबाबत.

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास अटक करून, सोन्याचे दागिने जप्त केल्याबाबत.

वरोरा 
चेतन लुतडे 

पोलीस स्टेशन वरोरा येथे दि.१७/०७/२०२४ रोजी फिर्यादि शरद सिताराम गुधाने, वय-५३वर्ष, रा. टेंभुर्डा ता. वरोरा यांनी जबानी रिपोर्ट दिली की, फिर्यादि व त्यांची पत्नी हे त्यांचे उघडे शटर असलेल्या चहाच्या दुकानात झोपुन असतांना, अज्ञात आरोपीतांनी, फिर्यादिच्या चहाच्या दुकानातील 
१) २६९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कि. अं-०६,७२,५००रू 
२) १,००,०००रू नगदि, 
३) एक कोको कम्पनीचा मोबाईल कि.अं.-८०००रू. असे एकूण ०७,८०,५००रू.चा माल चोरून नेला. अश्या फिर्यादिच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन वरोरा येथे कलम ३०५ भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


वरील गुन्हयाच्या तपासा दरम्यान वरोरा येथील डि.बी पथाकाने, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर व पोलीस स्टेशन कोरपना यांच्या मदतीने, तपासचे चक्र फिरवुन, गोपनिय माहीती वरून, आरोपीस २४ तासांत ताब्यात घेउन, आरोपीकडुन पिसीआर दरम्यान, फिर्यादिकडुन चोरलेले १) आठ सोन्याची अंगठी २) ०४ सोन्याच्या बांगडया ३) एक सोन्याची चपला कंठी ४) एक जोड सोन्याचे कानातले ५) दोन सोन्याची पोत ७) एक सोन्याचा गोफ एकुण सोन्याचे दागिने ८) ०२ मोवाईल ५) गुन्हयात वापरलेली शिवरलेट स्पार्क कार क्र.एम.एच.३४ ए.ए.३३२४, ६) गुन्हयात वापरलेली अॅक्टीव्हा क्र.एम.एच.३१ ई. व्ही. ९१८८. असा एकुण-०६,८५,०००रू.चा माल 
आरोपी नामे १) प्रदिप संजय शेरकुरे, २) आकाश नारायण शेरकुरे ३) चिंतामण संजय शेरकुरे ४) सौ. हरीणा प्रदिप शेरकुरे ५) सौ. मायाबाई देवगडे, सर्व रा. पारधी गुडा, धोपटाळा, ता कोरपना ६) विकास काळे रा.चिनोरा पारधी गुडा, ता.वरोरा यांच्या कडुन पि.सी. आर. दरम्यान जप्त करण्यात आला. तसेच फरार आरोपी अटक करून, गुन्हयातील उर्वरीत मुदद्देमाल जप्त करणे बाकी आहे.

वरील कारवाई श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक चंद्रपुर, श्रीमती रिना जनबंधु, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, श्रीमती नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक, वरोरा, श्री. महेश कोन्डावार, पो.नि., स्थागुशा, चंद्रपुर, श्री. अजिंक्य तांबडे, पो.नि.पोस्टे वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि विनोद जांभळे, पोस्टे वरोरा, सपोनि मनोज गदादे, स्थागुशा, चंद्रपुर, सपोनि विकास गायकवाड, पो.स्टे. कोरपना, तसेच पोलीस स्टेशन वरोरा येथील डि.बी. पथकातील पो.हेड.कॉ. दिपक दुधे, पो.अं.संदिप मुळे, विशाल राजुरकर, महेश गावतुरे, मोहन निषाद, राजु लोधी, यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. कोरपना येथील पोलीस स्टॉफच्या मदतीने करण्यात आली. 





Comments