घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्रांची रोजगारांच्या मागण्यासाठी खासदार किरसान यांना साकडे

घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्रांची रोजगारांच्या मागण्यासाठी खासदार किरसान यांना साकडे  

भूमिपुत्र संघटनेचे गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे  खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांना निवेदन

चंद्रपूर, दि. २८ जुलै २०२४ :

भूमिपुत्र संघटनेच्या वतीने घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या मागण्यांवर मागील अनेक वर्षांपासून सतत विविध माध्यमातून आंदोलने, मोर्चे काढून वाचा फोडण्याचे काम केले पटून अजून पर्यत न्याय न मिळाण्याचे नुकतेच गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. नामदेवराव किरसान साहेब चंद्रपूर दौऱ्यावर आले असता त्यांना  सदर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी त्यांनी यासंदर्भात लवकरच साकारात्मक चर्चा घडवून आणून आणि आपल्या मागण्यांना न्याय मिळवून देऊन असे ते म्हणाले. 
त्यांना सादर केलेल्यां निवेदनात घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवक व युवतींना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीत सामावून घेणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो, म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कंपन्यांवर कारवाई करणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घुग्घूस ते पांढरकवडा पांदन रस्ता आणि घुग्घूस ते सेनगाव पांदन रस्तावर केलेला अतिक्रमण हटवणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने शहर व ग्रामीण भागात सन २०१३ पासून ते आजपर्यंत CSR फंडातून केलेल्या खर्चाची कार्याची चौकशी करणे, जिल्ह्याधिकारी यांनी सदर लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करणे, विस्तारीकरणात ज्या शेतकऱ्याच्या जमिनी कंपनी अधिग्रहित करते त्या जमिनींचा मोबदला हा शेतकऱ्यांना थेट मिळावा, कंपनीचे अधिकारी यांनी विस्तारीकरणाच्या जनसुनानीच्या नोटिफिकेशनमध्ये जाहीरपणे सांगितले की कंपनीच्या परिसरात किमान दोन लाख वृक्षारोपण करण्यात आले असे खोटे व चुकीची माहिती सादर केलेल्या कंपनीवर कडक कारवाई करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि त्यांना योग्य पगार किमान ₹२०,००० ते ₹२५,००० रुपये देण्यात यावे, कंपनीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी अनेक लोकवस्तीचे पुनर्वासन करताना सर्वे क्रमांक १६७ आराजी ६३.६७३७ चौ.मी. एकूण ६२ प्लॉट रहिवासा करिता पुरावतीत आहे. जमिनीचे पट्टे देऊ असे खोटे आश्वासन कंपनी मार्फत देऊन त्या लोकवस्तीना स्थलांतरित करण्यात आले, लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून होत असल्याने दुर्घटनाला आमंत्रण नाकारता येत नाही. म्हणून कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करण्यात यावे, स्थानिक महिला बचत गटांना कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून घरेलू उद्योगाकरिता प्राधान्य द्यावे यांचा समावेश आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती, काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे,ओबीसीचे नेते सचिन राजुरकर, भूमिपुत्र संघटनेचे पवन आगदारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश आवारी,  प्रमोद बोरीकर, कृष्ण मसराम  याची उपस्थिती होती.

जाहिरात 

Comments