२५४ लोकांची आरोग्य तपासणी व औषध वाटप**५१ जणांनी केले रक्तदान**२५० लोकांना नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप*

*२५४ लोकांची आरोग्य तपासणी व औषध वाटप*

*५१ जणांनी केले रक्तदान*

*२५० लोकांना नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप*

*गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण*

 अतुल कोल्हे भद्रावती :-

               आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) आणि नंदू सूर बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. नंदू सूर स्मृतीदिनानिमित्त रविवार, २८ जुलै २०२४ रोजी सामुदायिक भवन कुचना येथे भव्य आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेकोली माजरी क्षेत्राचे मुख्य व्यवस्थापक प्रमोद कुमार तर प्रमुख पाहुणे क्षेत्रिय कार्मिक व्यवस्थापक श्रीनिवास राव, कार्मिक व्यवस्थापक अशोक जोशी, श्री साई नागरी सहकारी पथ संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जी.प. सदस्य प्रवीण सूर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगीचे प्रमुख डॉ. शशांक गोतरकर, माजी सभापति राजेंद्र चिकटे, सामाजिक कार्यकर्ते राजेश रेवते, बबलू राय, रवी भोगे वासुदेव मत्ते, वसंतराव चावले, मधुकर साळवे, हरीश जाधव, बबनराव बदकी, विक्तु बुरचुंडे, बळीराम मांढरे, आदी उपस्थित होते.  आयोजित आरोग्य शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, अस्थि रोग, कर्करोग, कान नाक घसा रोग, श्वसनाचे आजार, मानसिक आजार, त्वचारोग व शस्त्रक्रिया या विषयातील २४ तज्ज्ञ डॉक्टरांनी २५४ रुग्णांची तपासणी करून मोफत औषधांचे वाटप केले. तर सावंगी रुग्णालयात ३४ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.  डॉ. अविनाश बागडे लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरच्या टीमने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.  जगन्नाथ नेत्रालय नागपूरच्या वतीने २५० लोकांची नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल अडवे, प्रमोद आस्वले, किसन सूर, हरी सुर मत्ते गुरुजी, प्रफुल ताजणे यांनी अथक परिश्रम घेतले. सामाजिक कार्यकर्ते व माजी जि.प.सदस्य प्रवीण सूर यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments