शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे अरबिंदू कोळसा खाण कंपनीला मूर्ती जागेवर आणावी लागली.ग्रामदेवतेची मूर्ती हटवल्याने गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या.
ग्रामदेवतेची मूर्ती हटवल्याने गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या मध्यस्थीने मूर्ती जागेवर वापस आणली.
वरोरा
चेतन लुतडे
भद्रावती तालुक्यातील बेलोरा गावाशेजारी अरबिंदू कोळसाखानीमध्ये खान प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. अरबिंदू कोळसाखान प्रशासनाने बेलोरा ग्रामस्थांना कुठल्याही सूचना न देता गावाचे आराध्य दैवत असलेली मूर्ती परस्पर रित्या दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याने गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. या आधी सुद्धा या कंपनीने गावकऱ्यांच्या बऱ्याच मागण्या धूडकाऊन लावत मूजोरीने काम सुरू केले आहे.
हा परिसर वनविभागातील व्याघ्र संरक्षणासाठी काही भाग संरक्षित असून नदीतून वाघाचे येणे जाणे सुरू असते. त्याचे तंतोतंत पालन अजून पर्यंत करण्यात आले नाही.
कोळसा उत्खनन नियमानुसार गावाचे पुनर्वसन ,गावाचा विकास , प्रदूषणाचे निकष, रोजगारांचा प्रश्न, शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला असे बरेचसे महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.
त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे खान व्यवस्थापन व बेलोरा ग्रामवासीय यांच्यामध्ये चर्चा घडविण्यात आली होती. या चर्चेदरम्यान बेलोरा या गावासंदर्भात कुठलेही कार्य करायचे असेल तर त्याची रीतसर माहिती बेलोरा ग्रामपंचायतींना द्यावी व त्यांचा होकार घेऊनच पुढील कार्यवाही करावी असे ठरले होते .
परंतु अरबिंदू कोलमाइंस व्यवस्थापनाने ग्रामस्थांना कुठली सूचना न देता त्यांचे ग्रामदैवत हलवून परस्पर दुसऱ्या ठिकाणी ठेवल्याने गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. यासंदर्भात ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांना सूचना केल्या व त्या सूचनेवरून समस्त ग्रामवासियांसह वरोरा विधानसभेचे समन्वयक विलास पचाके उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम व बेलोरा येथील सरपंच उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत अरबिंदू खान व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन उभारण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते यांचा आक्रमक पवित्रा पाहून अरबिंदू खान प्रशासनाने अखेर गुडघे टेकले. गावाचे आराध्य दैवत असलेली ग्रामदेवतेची मूर्ती पुन्हा त्याच जुन्या जागेवरती ठेवण्यास भाग पाडल्याने गावकरी शांत झाले.
याप्रसंगी भद्रावती तहसीलदार व भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इंगळे व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी गावकरी व कंपनीच्या माध्यमातून समेट घडवून वाद मिटवण्यात आला.
याप्रसंगी बंराज गावातील प्रशांत मते ,बंडू आगलावे ,प्रशांत मते ,प्रवीण मते, विकास पंडिले ,सोमा देहारकर ,अतुल मते ,सरलाताई ठोंबरे व अनेक महिला भगिनी व गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
जाहिरात
Comments
Post a Comment