भाजपचे युवा नेतृत्व किशोर टोंगे यांचा स्तुत्य उपक्रम
चेतन लुतडे वरोरा
सद्या पावसाळा सुरु असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या भर पावसात देखील शेतकरी शेतमजूर महिलांना शेतीची कामे करावी लागतात. मात्र आजही अनेक महिलांना शेतात कामे करताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट किंवा अन्य पावसाळी साहित्य उपलब्ध नसते. यावेळी काही महिला गोणपाटपासून घोंगडी तयार करतात तर काही पावसात भिजतच काम करतात.
अशावेळी या शेतमजूर महिलांचे पावसापासून संरक्षण व्हावे किंवा त्यांचा किमान छोट्या पावसात बचाव व्हावा आणि दिवसभर त्यांना शेतकामे करता यावी या उद्देशाने गावागावात शेतात काम करणाऱ्या या महिलांना भाजपचे वरोरा-भद्रावती क्षेत्रातील युवा नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांनी शेतमजूर महिलांना रेनकोट तर गुराख्यांना छत्री वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला असून या उपक्रमाचे ग्रामीण भागात कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना किशोर टोंगे म्हणाले की, शेतकऱ्यांचे जीवन हे कायमच कष्टप्राय राहिले असून त्यांना ऊन पावसात काम करावं लागते. पावसाळ्यात महिलांना दिवसभर भिजत काम करावे लागते तर कधी अचानक पाऊस येऊन जातो यावेळी त्यांना किमान रेनकोट चा वापर करता यावा व आपल्या शरीराच सरंक्षण करता यावं या हेतूने माता भगिनींसाठी हा उपक्रम राबविला आहे.
या रेनकोट व छत्रीच्या सुखद भेटीमुळे महिला भगिनी आनंदी झाल्या असून आमचे सरंक्षण व्हावे यासाठी ही भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले तर त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment