वरोरा
चेतन लुतडे
वरोरा येथील उडान पुलावर कार व दुचाकीचा अपघात झाल्याने पाच जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीने जाणाऱ्या देवगडे परिवारातील
अभिजीत देवगडे वय 7 वर्ष, अजय देवगडे वय 10 वर्ष, विजय देवगडे वय 40 वर्ष, मुक्तेश्वर देवगडे वय 40 वर्ष, यांना गंभीर दुःखद झाली असून उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारार्थ दाखल केल्यानंतर जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलाची प्रकृती गंभीर असल्याची कळते. अपघात रात्री 9.30 वाजताच्या सुमारास वरोरा उडान पूल वरील बस स्थानकाच्या पुढील भागात झाला. यामध्ये कारचा उजवा टायर फुटल्याने कारचालकाचे संतुलन गेल्याने पुढे जात असलेल्या दुचाकीला धक्का दिल्याने त्यावरील लहान मुलगा पुलावरून खाली पडला. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खैरगाव येथील काही मित्रांनी मदत करून लगेच जिल्हा रुग्णालय गाठले आहे. सदर प्रकरणातील दुचाकी आणि कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
...........
Comments
Post a Comment