शाळाबाह्य व स्थलांतरित बालके शोध मोहीमेला सुरुवात.


राजकारणातील खरे समाजकारण 
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी ठरले देवदूत.

वरोरा 16/7/2024
चेतन लुतडे 

चंद्रपूर जिल्ह्यात शासन निर्णयानुसार 5 जुलै ते 20 जुलै 2024 या कालावधीत शाळाबाह्य व स्थलांतरित बालके शोध मोहीम सुरू झाली आहे. या अंतर्गत दिनांक 13 जुलै 2024 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने  आनंदवन चौक वरोरा परिसरातील शाळाबाह्य व स्थलांतरित बालके शोध मोहीम राबविण्यात आली. 
 यात सहा ते चौदा वयोगटातील भटकंती व्यवसाय करणाऱ्या पालकांची मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले. परंतु सदर बालकांचे पालक त्यांच्या पाल्यास नियमित शाळेत दाखल करण्यास उदासीनता दाखवत होते.  कायद्यानुसार पोलिसांचा धाक दाखवत  पाल्यास शाळेत दाखल करण्याबाबत वारंवार समजूत देऊन सुद्धा हे पालक ऐकत नव्हते. ही बाब बालकांना माहित पडल्यास दुसऱ्या गावाला स्थलांतरित करत होते. त्यामुळे अशा मुलांना शाळेत टाकने कठीण कार्य बनत चालले होते.

जिल्हाप्रमुखाना माहिती पडतास  शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रशासना तर्फे राबविण्याचे ठरविले. त्यानुसार संबंधित विभागाची मदत घेऊन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची मदत मागण्यात आली. 
 शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते , तालुकाप्रमुख राजेश डांगे, विलास परचाके, ठाणेदार  वरोरा , गटशिक्षणाधिकारी चहारे , पं.स. वरोरा ,से.नि. शिविअ नामदेव राऊत , मु.अ. आश्रम सुमाठाना, मा.स.शि. शाळा अजय मुडपल्लीवार सर, साधनव्यक्ती खुशाल ,गटसाधन केंद्र वरोरा तसेच वरोरा येथील नागरिक यांच्या सहकार्याने  शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधण्यात आले. विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर भिती पोटी आरडाओरड सुरू केली. यानंतर आई-वडील यांच्या मदतीने समजावण्यात आले. यावेळी वार्डातील वातावरण पाहण्यासारखे होते. "जसे एखाद्या वाघाला पिंजऱ्यात पकडण्यासारखे काम सुरू होते."  जिल्हाप्रमुख व संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी पालकांना समजावून सांगत त्यांचा होकार मिळवला. याबाबत आपुलकीने जिल्हाप्रमुखांनी मार्गदर्शन केले. शेवटी सर्वांच्या उपस्थितीत सदर बालकांचे पालक आपल्या पालकांना नजीकच्या शाळेत दाखल करण्यास तयार झाले. 


आश्रम शाळा सुमठाना येथे या सर्व मुलांना पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त करून त्याच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. हे मुले वरोरा तालुक्यात भिक्षा मागून आपले पोट भरत होते. पालावरचे घरे असल्याने आई-वडील लक्ष  देऊ शकत नव्हते. अनेक दिवसापासून अशा मुलांचा वावर वाढला होता. अशा शाळाबाह्य विद्यार्थ्यांची दखल घेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत स्तुत्य उपक्रम राबवला. या ठिकाणी बरेचसे मुले शिक्षणामूळे सुधारले असून इथून गेलेल्या नवीन विद्यार्थ्यांना लगेच सामावून घेतले. 
सूमठाणा आश्रम शाळेमध्ये या आधी सुद्धा बरेच वंचित विद्यार्थी जिल्हाप्रमुखांनी पोहोचवले आहेत. त्यामुळे जिल्हाप्रमुखांना पाहताच आनंदोत्सव साजरा करू लागले. जिल्हाप्रमुखांनी सुद्धा त्याच प्रेमाने त्यांची विचारपूस करून मायेचा हात फिरवला. यावेळी सर्व शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी जिल्हाप्रमुख नितीन मते यांच्या सोबत सेल्फी घेऊन आपला दिवस साजरा केला. 
यापुढे कोणतीही मदत लागल्यास मोठा भाऊ म्हणून मदत करेल असे आश्वासन शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जिल्हाप्रमुख नितिन मत्ते यांनी दिले. 




Comments