भद्रावती येथे कारगिल विजय दिवसाचा रौप्य महोत्सव* *विविध कार्यक्रमांचे आयोजन .*

*भद्रावती येथे कारगिल विजय दिवसाचा रौप्य महोत्सव* 

 *विविध कार्यक्रमांचे आयोजन .* 

चेतन लुतडे वरोरा 

भद्रावती -जय हिंद फाउंडेशन चंद्रपूर आणि स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या  संयुक्त विद्यमाने दि. २६ जुलै रोज शुक्रवार ला सकाळी ११ वाजता स्थानिक श्री मंगल कार्यालयात कारगिल विजय दिवसाचा रौप्य महोत्सव आयोजित  करण्यात आलेला आहे.
  याप्रसंगी कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारत मातेच्या सुपुत्रास श्रद्धांजलीपर कार्यक्रम तसेच माजी सैनिक, वीर माता - पिता, वीर पत्नी, आणि आजी-माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
      या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे  संस्थापक तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे, चांदा आयुध निर्माणीतील ले-कर्नल बी. एस .रावत, तहसीलदार अनिकेत सोनवणे, पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, जिल्हा सैनिक कार्यालयाचे दिपक लिमसे, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक  शिंदे, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक चेतन भिसे आणि स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे  अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले प्रामुख्याने उपस्थित राहतील.
  यानिमित्ताने अमरावती येथील राष्ट्रीय युवा सत्यशोधक प्रबोधनकार वैभवकुमार निमकर यांचे सैनिकांची शौर्यगाथा या विषयावर व्याख्यान  आयोजित करण्यात आले आहे. कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने शाळा -महाविद्यालयात  कारगिल विजय दिवसावर आधारीत विविध स्पर्धा आयोजित  करण्याचे आवाहन जय हिंद फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे. यात प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा इत्यादी स्पर्धांचा समावेश राहतील.

Comments