*जिल्ह्यातील पहिल्या काजु उद्योगाची भद्रावतीत सुरुवात**अभियंता अक्षय बंडावार या तरुणाने केला नविन प्रयोग**तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन*

*जिल्ह्यातील पहिल्या काजु उद्योगाची भद्रावतीत सुरुवात*

*अभियंता अक्षय बंडावार या तरुणाने केला नविन प्रयोग*

*तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन*

अतुल कोल्हे भद्रावती : 
             नोकरीच्या मागे न लागता विविध प्रकारची उद्योग निर्मिती करुन करीअर करण्याचा यशस्वी प्रयत्न अनेक तरुण आजकाल करताना दिसतात. चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक संसाधनावर आधारीत अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यात प्रोसेसिंग व मॅनुफॅक्चरींग वर आधारीत उद्योग कमीच आहेत. उद्योग उभा करताना नविन प्रयोग करण्याचा विचार तरुण वर्ग अभावानेच करतो. मात्र भद्रावतीच्या एका तरुणाने जिल्ह्यात नविन प्रयोग करीत शहरात काजु उद्योग सुरु केला आहे. अश्रुड काजु उद्योग असे या उद्योगाचे नाव असून अक्षय बंडावार असे या उद्योगाशिल तरुणाचे नाव आहे. अक्षयने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

नुकतेच या उद्योगाचे तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिंदे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

हा एक प्रोसेसिंगवर आधारीत उद्योग आहे. यात कच्च्या काजुवर प्रक्रिया करुन विविध प्रकारचे काजु तयार करून त्याला बाजारात विकल्या जाते. दररोज दोन टन काजुवर प्रक्रिया केली जाते. त्यासाठी एकूण दहा मशिनरीज लावण्यात आल्या आहेत. दक्षिण आफ्रिका, बेनिन, टांझानिया, घाना या देशातून रॉ काजु आयात करण्यात येत आहे. तर काही प्रमाणात कोंकण मधून देखील काजु बोलाविल्या जात आहे. या रॉ काजु वर प्रक्रिया करुन काजुचे विविध प्रकार बनविल्या जाणार आहेत. राज्यात, राज्याबाहेर व देशाबाहेर काजुसाठी बाजारपेठ उपलब्ध आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग होत आहे.

अभियंता अक्षय ने सुरु केलेला हा काजु उद्योग जिल्ह्यात पहिलाच आहे. त्यासाठी त्याने या अगोदर सदर उद्योगाकरीता रीतसर प्रशिक्षण घेतले आहे. मागील अनेक महिन्यांपासून त्याची तयारी सुरू होती. मशिनरीज इंस्टाल करुन काजु बोलाविण्यात आला. व आता प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होणार आहे. अक्षयच्या या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे.
--------------------------------------

सदर उद्योग चालू करण्यासाठी माझ्या आई वडिलांनी मला साथ दिली. सोबतच आयपीएस आयुष नोपानी, आयपीएस नयोमी साटम व मित्रमंडळींचे मार्गदर्शन लाभले. उद्योग सुरू करण्यापूर्वी मी रीतसर प्रशिक्षण घेतले व हा नविन प्रयोग सुरु करण्याचे धाडस केले आहे. यात यशस्वी होण्याचा मी नक्की प्रयत्न करेल.

Comments