आठ दिवसांपूर्वी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला**आपत्ती व्यवस्थापनाकडून पोलीस प्रशासनाला कुठलीही मदत नाही*
*आपत्ती व्यवस्थापनाकडून पोलीस प्रशासनाला कुठलीही मदत नाही*
अतुल कोल्हे भद्रावती :-
तालुक्यातील खुटवंडा येथे आठ दिवसांपूर्वी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह अखेर दिनांक २८ रोज रविवारला सायंकाळी पाच वाजता खुटवंडा येथील नाल्याच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अमित पेंदाम, वय 24 वर्षे, राहणार खुटवंडा असे या मृतक युवकाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी मुसळधार पावसामुळे सदर नाल्याला पूर आला होता. नाल्याजवळ उभ्या असलेल्या या युवकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व वाहून गेला. त्याला शोधण्याची मोहीम चार-पाच दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येत होती. मात्र पुरामुळे त्याचा शोध लागला नव्हता. अखेर पूर ओसरल्यानंतर त्याचा मृतदेह नाल्याच्या पात्रात आढळून आला. या शोधमोहिमेत आपत्ती व्यवस्थापनाकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचा खेद पोलीस प्रशासनाने व्यक्त केला. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुडे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहे.
Comments
Post a Comment