*जि. प. शाळा मांगलीला शिक्षणाधिकारी यांनी दिली भेट**शिक्षणाधिकाऱ्यांकडून दप्तर मुक्त शनिवारचे कौतुक : शालेय वर्ग व अध्यापनाची केली पाहणी*

*जि. प. शाळा मांगलीला शिक्षणाधिकारी यांनी दिली भेट*

*शिक्षणाधिकाऱ्यांकडून दप्तर मुक्त शनिवारचे कौतुक : शालेय वर्ग व अध्यापनाची केली पाहणी*

अतुल कोल्हे भद्रावती ;-
                      पंचायत समिती भद्रावती अंतर्गत येत असलेल्या जि. प. उच्च प्राथमिक शाळा मांगली ( रै. ) येथे दिनांक 06 जुलै 2024 रो शनिवारला जि. प. चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) मा. अश्विनी सोनवणे व पंचायत समिती भद्रावती चे गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. प्रकाश महाकाळकर यांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी शालेय वर्ग व अध्यापनाची पाहणी केली. व अद्यापनाबाबतित शैक्षणिक साहित्याचा वापर करण्याविषयी सांगण्यात आले. वार्षिक व मासिक नियोजन बघुन त्यामध्ये शैक्षणिक साहित्याचा उल्लेख करण्याचे सांगितले. या दरम्यान दप्तर मुक्त शनिवारचे कौतुक करण्यात आले. तसेच प्रत्येक शनिवारला दप्तर मुक्त शनिवार साजरा करताना विद्यार्थ्यातील अभिव्यक्ती बाहेर काढण्याचे व त्यांना इंग्लिश स्पिकिंग कोर्स तथा वैज्ञानिक प्रयोगाची मांडणी करण्याकडे लक्ष देण्यात यावे असे सांगितले. त्याच प्रमाणे दि. जुलै 2024 ला शाळेची विद्यार्थि कुमारी मनस्वी इंगोले हिचा रस्ता सुरक्षा अभियान यावरील निबंध स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम तर पूर्वी केळझरकर तिचा  चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक आला. त्यांना अनुक्रमे 3000 रुपये व 1000 रुपये माननीय विनय गौडा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या हस्ते शिल्ड व पारितोषिक देण्यात आले.
या दोन विद्यार्थी मुलींचे मा. शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे मॅडम यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. सुनील मामीडवार, मुख्याध्यापक संजय माथनकर. विषय शिक्षक अजय बोंडे, कु. नीलिमा वानखेडे सहाय्यक शिक्षिका, कु. मंदाकिनी दुपारे, कु. ममता जिवतोडे, सौ प्रिया नागपुरे, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. अशी ही शिक्षणाधिकाऱ्यांची एकंदरीत भेट शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरली.

Comments