वरोरा येथील डायरिया मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई करा

वरोरा येथील डायरिया मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई करा

 मालविय वार्ड येथील पिडीत वांढरे कूटूबींयासह वार्ड वासियांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना ऊचीत न्याय मागन्याकरीता निवेदन

वरोरा :   नगर परिषदेच्या नाकर्तेपणामुळे येथील मालविय वार्डातील चार वर्षीय बालक पूर्वेश सुभाष वांढरे याचा नुकताच  डायरियाने मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेची गंभीर जबाबदारी नगर प्रशासनावर निश्चित करण्या सोबतच मृत मुलाच्या कुटुंबाला भरपाई मिळवून देण्यासाठीच्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राहुल देवडे यांच्या नेतृत्वाखालील मालविय वार्डातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले.
      निवेदनात शहरातील मालविय प्रभागातील स्मशानभूमी जवळील नालीच्या लगत असलेल्या नळाच्या पाण्याचा व व्हॉल लिक आहे. त्या ठिकाणच्या जागेची अनेक दिवसांपासून स्वच्छता करण्यात आली नाही. आणि त्याच स्थितीत पाणीपुरवठा सुरू आहे. नालीचे घाण पाणी लिक व्हॉल मधूनच नळाद्वारे  घरोघरी पुरवठा होत आहे. हे दुषित पाणी पिण्यात आल्याने मालविय वार्ड परिसरातील दोन, तीन कुटुंबांतील सदस्यांना डायरियाची लागण झाली. यात पूर्वेश वांढरे नामक चार वर्षीय मुलाचा नाहक बळी गेला. इतर बुडू वांढरे, प्रतिक्षा वांढरे, शोभा वांढरे, ओम बुरटकर, सौंदर्य बुरटकर आदींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  
       शुद्ध पेयजल व स्वच्छता बाबत नगर परिषदेची कमालीची उदासीनता या संपूर्ण घटनेला कारणीभूत ठरत आहे. अनेकदा तक्रारी नंतरही त्याचे निराकरण होत नाही, ही शोकांतिका आहे.
       मृत मुलाचे पालक मिस्त्री काम करतात त्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने या संपूर्ण घटनेची गंभीर जबाबदारी नगर प्रशासनावर निश्चित करण्या सोबतच मृत मुलाच्या कुटुंबाला नगर प्रशासना तर्फे आर्थिक सहाय्य अपेक्षित आहे. भविष्यात  असे प्रकार घडू नये म्हणून शहरात सर्वच प्रभागात योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात यावे, इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.
   शिष्टमंडळात.सामाजिक कार्यकर्ता राहूल देवडे,मृतक पूर्वेशचे वडील सुभाष वांढरे,शामराव झाडे,अरून सोयाम,रामदास बहादे,प्रविन कायरकर,सुनिल झाडे,अनिल हिवरकर,राहूल मेश्राम,शुभम पवार,गणेश तांदूळकर,आकाश खतारे,रोशन बहादे,मोबीन पठान,छोटू चव्हान,मनिष गोचे,सुरज जेगंठे,आदींचा समावेश होता.

Comments