जनसामान्याचा सामान्य नेता नितीनभाऊ*मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व शिवसेना सदस्य नोंदनी वरोरा विधानसभा क्षेत्रात जोरकसपणे राबविणार - नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर*

जनसामान्याचा सामान्य नेता नितीनभाऊ

*मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व शिवसेना सदस्य नोंदनी वरोरा विधानसभा क्षेत्रात जोरकसपणे राबविणार - नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर*

वरोरा 
चेतन लुतडे वरोरा 

महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने व  किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे सूचनेनुसार तथा  किशोरजी राय संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा यांचे मार्गदर्शनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चंद्रपूर जिल्हयातील वरोरा विधानसभा क्षेत्रात जन सामान्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी श्री नितीन मते यांनी घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून वरोरा विधानसभा क्षेत्रातील तळेगांव ता . वरोरा या गावांमध्ये आज निशुल्क फॉर्म उपलब्ध करून माता - भगिनी कडून ते भरून घेतले त्यासाठी   श्रीकांत खंगार तालुका प्रमुख वरोरा यांनी जिल्हाप्रमुख नितीन मते यांच्या सूचनेनुसार व्यवस्था करून  नितीन मते यांनी स्वतः हे सर्व फार्म भरून घेतले व त्याच बरोबर शिवसेना सदस्य नोंदनी अभियान राबविण्यात आले त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
 त्यामुळे तळेगाव परिसरात सर्व माता भगिनींनी नितीन मत्ते यांचे विशेष आभार मानून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज तळेगांव परिसरामध्ये समाजकारण करून जनतेला न्याय देन्याचं काम व शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याच काम नितीन मत्ते हेच करू शकतात अशी भावना वरोरा विधानसभा क्षेत्रात ऐकण्यास मिळत आहे . या क्षेत्राचा युवा नेतृत्व म्हणून नितीन मते यांच्याकडे बघितल्या जाते अशा भावना जनसामान्यांमधून उमटत होत्या यावेळी तळेगांव येथील सर्व पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात जिल्हाप्रमुख या नात्याने शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला लाडकी बहीण योजने संदर्भात ऑफलाइन फॉर्म भरून घेण्याचे आव्हान केले आहे.
 खेड्या गावातील रोज मजुरीला जाणाऱ्या गरजू महिला ,शेतकरी महिला ,मजूर महिलांनी आधार कार्ड ,राशन कार्ड, जन्माचा पुरावा घेऊन शिवसेना कार्यकर्त्यांजवळून फॉर्म भरून घ्यावा. हे सर्व फॉर्म जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या सहकार्याने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाप्रमुखांनी स्वतः गावात जाऊन लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे सुरू केले आहेत. या विशेष मोहिमेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून जनसामान्याचा सामान्य नेता म्हणून नितीन मत्ते यांची ओळख आहे. 

लाडकी बहीण योजनेचा लाभ संबंधित महिलांना मिळण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आव्हान जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी केले आहे.

जाहिरात 

Comments