वरोरा येथील मालवीय वार्डातील डायरियाची लागण होऊन बालकाचा मृत्यू झालेल्या प्रकरणात जबाबदार व्यक्तीस कठोर शासन करा.नागरिकांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा.

वरोरा येथील मालवीय वार्डातील डायरियाची लागण होऊन बालकाचा मृत्यू झालेल्या प्रकरणात जबाबदार व्यक्तीस कठोर शासन करा.

नागरिकांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा. 


वरोरा 8/7/24
चेतन लुतडे 
वरोरा  येथील मालवीय प्रभागातील नळाच्या पाईप लाईन वॉल मधून सांड पाण्याच्या नालीचे पाणी आत जाऊन दूषित झालेले पाणी पिल्याने या परिसरातील अनेक नागरिकांना डायऱ्याची लागण झाली होती .तर डायरिया होऊन उपचारादरम्यान पूर्वेस सुभाष वांढरे वचार या बालकाचा मृत्यू झाला. यामध्ये जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात यावी या संबंधाची मागणी वार्डातील नागरिकांनी केली आहे. 
 यासोबतच प्रभागात मोठ्या प्रमाणात गवत, काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.  प्रभागातील स्ट्रीट लाईट नेहमी बंद राहते पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. प्रभागातील नाल्यांची नियमित सफाई केली जात नाही नाल्या सफाई केल्यास तो गाळ कित्येक दिवस उचलल्या जात नाही . अशा अनेक समस्या मालवीय प्रभागात आहे. त्या त्वरित सोडवण्यात याव्या ही विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. 
 अन्यथा नगर परिषदेवर नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल काही अनुचित घटना घडल्यास ही प्रशासन जबाबदार  राहील. या आशयाचे परिसरातील नागरिकांच्या सह्याचे  निवेदन नगरपालिकेचे सीओ , तहसीलदार, पोलीस ठाणेदार व संबंधित विभागाकडे व अधिकाऱ्याकडे देण्यात आलेले आहे. 
हे निवेदन सादर करताना  लखन केशवानी, बंडू लभाने, महेश पवार, अमित घोडमारे ,प्रणय खातकर, किसन कळसकर आदी नागरिक उपस्थित होते.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री सहाय्यता केंद्र उभारणार. जिल्हाप्रमुख नितिन मत्ते.

Comments