न.प.मुख्याधिकारी भोयर यांनी वैभव डहाणे यांना आंदोलन मागे घेण्याचे दिले पत्र.*तेरा तासानंतर डहाणे टॉवर वरून खाली उतरले.*
*तेरा तासानंतर डहाणे टॉवर वरून खाली उतरले.*
शिवसेना ऊ.बा.ठा. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे व जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांचा आंदोलनाला पाठिंबा.
वरोरा
चेतन लुतडे
वरोरा शहरातील मालवीय वार्डात राहणाऱ्या वांढरे कुटुंबातील लहान मुलाचा अतिसाराने मृत्यू झाला होता. या घटनेला पंधरा दिवस उलटून सुद्धा न्याय मिळाला नसल्याची खंत स्थानीय सामाजिक कार्यकर्ता वैभव डहाने यांनी व्यक्त केली होती. यानंतर निवेदन देऊन कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे वांढरे परिवारांना न्याय व पाणीपुरवठा करणाऱ्या विदर्भ मल्टी सर्विसेस या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येण्याची भूमिका घेत तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून भव्य शुक्रवारी सकाळपासून आंदोलन सुरू केले होते.
दिवसभरा दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या यामध्ये आंदोलकांनी वरोरा शहरातील रोड मधोमध बसून आंदोलन पुकारले होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी साठम यांनी तंबी देत आंदोलकांना फटकारले व रस्ता पूर्ववत सुरू केला.
आंदोलक वैभव डहाणे यांनी टोकाची भूमिका घेत मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
केली होती. मात्र जोपर्यंत लहान मुलाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत असे म्हणणे संयुक्तिक नसल्याचे पोलीस अधिकारी साठम यांनी म्हटले.
विदर्भ मल्टी सर्विसेस यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी त्यांच्याविरुद्ध पुरावे असने आवश्यक असल्याची बाब मुख्याधिकार्यानी सांगितले. वैद्यकीय अहवालानुसार त्या दिवशी उपजिल्हा रुग्णालयात चार ते पाच रुग्ण अतिसराचे असल्याचे सांगितले होते. जर अतिसार झाला असता तर सगळ्या वार्डात पसरला असता. तो फक्त एखाद्या घरापुरता कसा काय मर्यादित असता असाही प्रश्न उपस्थित राहिला. आंदोलन कर्त्यांनी पाण्याचे तपासणी अहवाल चुकीचा दिल्याचा आरोप केला. यानंतर लहान मुलांच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय कोणतीही कारवाई होऊ शकत नाही असे स्पष्ट मत उपविभागीय पोलीस अधिकारी साठम यांनी उपविभागीय अधिकारी लंगडापुरे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.
वांढरे परिवारात आर्थिक मदत म्हणून नगरपालिकेने 15 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. मात्र एवढी रक्कम नगरपालिका देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.
यानंतर मुख्याधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे वैभव डहाणे यांना कळविण्यात आले.
या पत्रातील आशय
नगर परिषद क्षेत्रात पाण्यापासून होणाऱ्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी न.प. वरोरा येथील ईतर वार्डातील विविध ठिकाणचे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार साफसफाई करून ,आवश्यक तिथे किरकोळ पाईपलाईन दुरुस्ती करण्यात आले. व खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित वार्डामध्ये नागरिकांना जीवन ड्रॉप निशुल्क वाटप करण्यात आलेले आहे. याबरोबरच नगर परिषद प्रशासनाने नागरिकांमध्ये पाणी खूष आजाराला प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक सुचना / खबरदारी घेण्याच्या दृष्टीन जाहिर मुनादी देउन व्यापक जनजागृती करण्यात आलोनी आहे.
नगर परिषद वरोरा अंतर्गत पाणीपुरवठा देखभाल दुरस्ती वार्षिक निवीदा ही प्रशासना मार्फत ई- निवीदा पध्दतीने प्रसिद्ध करण्यात आली असून निवेदेचा तांत्रीक लिफाफा उघडुन प्राप्त निवीदा धारकाचे कागदपत्राचे छाननी सुरु आहे. व अजुनपावेतो निवीदेचा आर्थिक लिफाफा उघडण्यात आलेला नाही, यामुळे आपले निवेदनात नमूद पुढील ३ वर्षासाठी ७ लाख रु.महिन्याने संबंधित काम वाढवून दिलीने आहे असे म्हणन संयुक्तीक नाही. या आशयाचे पत्र नगरपालिकेचे सीओ गजानन भोयर यांनी दिले आहे.
तरी संबंधित भागातील घडलेल्या अनुचित प्रकाराबाबत नगर परिषद स्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी सह चौकशी समिती गठीत केलेली असून याबाबत सखोल चौकशी सुरु आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तसेच या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकाचा शवविच्छेदन (Pat) अहवाल प्राप्त झाल्यानंतर यामध्ये नगर परिषदेच्या दुषित पाण्यामुळे संबंधित बालकाचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाल्यास कारणीभूत संबधितावर तसेच विदर्भ मल्टी सर्विसेस या कंपनीवर नियमानुसार कार्याही प्रस्तावित करण्यात येईल असे म्हटले.
आंदोलक वैभव डहाणे संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर खाली उतरले. यानंतर नगरपालिका निष्काळजीपणा करणार नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
*आजची ठळक वैशिष्ट्ये व चर्चा*
१) पाणी नमुने तपासणी अहवाल
२) चौकशी समिती गठीत केल्याचा आदेश
3) बालकाचा शवविच्छेदन अहवाल सादर करणे
4) ई निविदा तांत्रिक अहवाल
5) तात्काळ पाईपलाईनची दुरुस्ती , नागरिकांना जीवन ड्रॉप मोफत देणे.
6)पाणी सदृश्य आजाराला आळा घालण्यासाठी न.प. द्वारा उपाययोजना करणे.
८)तेरा तासानंतर आंदोलक खाली उतरले.
9) यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे आणि विधानसभा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
10)दुपारच्या दरम्यान आंदोलकांनी रस्ता बंद केला.
11) वैभव डहाणे यांनी वांढरे परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे व आर्थिक सहकार्य मिळाले पाहिजे , त्याचप्रमाणे पाणीपुरवठा करणाऱ्या विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
Comments
Post a Comment