*खरवड येथे ग्राम स्वच्छता अभियान ,गावातील युवकांनी ठेवला आदर्श*

*खरवड येथे ग्राम स्वच्छता अभियान ,गावातील युवकांनी ठेवला आदर्श*

चेतन लुतडे 

वरोरा:- तालुक्यातील खरवड येथे युवासेना प्रमुख आमदार आदित्य उध्दवजी ठाकरे, पुर्व विदर्भ सर्पकप्रमुख शिवसेना नेते आम.भास्करजी जाधव,युवासेना सचिव वरुनजी सरदेसाई,युवासेना कार्यकारणी सदस्य शितलताई देवरुखकर, हर्षलजी काकडे यांचे मार्गदर्शनाची ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
गावातील युवकांनी ठेवला आदर्श  युवा सेना  ग्राम स्वच्छता अभियान मोहीम.रामानंद वसाके, यांच्या प्रयत्नाला भरघोस गावकरी मडळी कडुन प्रतिसाद मिळाला पुर्व विदर्भ युवासेना सचिव तथा गोडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे,जिल्हाप्रमुख शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) रविन्द्र शिंदे युवासेना जिल्हा प्रमुख रोहण कुटेमाटे, विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे  यांच्या नेतृत्वा  युवासेना 
उपतालुका प्रमुख रामानंद वसाके यांनी आपली इच्छा व्यक्त केली आणि या मोहिमे मध्ये सहभागी असलेले खरवड गावातील युवकांना विचारात घेऊन आपलं मत मांडले आणि त्यांनी सुध्दा या. युवा सेना ग्राम स्वच्छता अभियान मध्ये सहभागी झाले.या मध्ये प्रफुल्ल गिरडकर, अमोल आडकिने, शिवम डवरे, प्रशांत तळवेकर, यादव डवरे, गणेश वसाके, विजय सोनुले, नरेंद्र वसाके, विजय काटवले, गणेश वाढई, यांच्या अथक प्रयत्नांनी  गावातील युवा पिढीचा सुध्दा खुप मोलाचा वाटा आहे या मध्ये पंढरी गुरनुले,आशिष लालसरे,विजय येरगुडे, मंगेश वसाके, प्रतीक डवरे, येशोधन वाटगुरे, दीपक वाटमोडे मनोज महाडोळे, ऋषभ डवरे, नितेश लालसरे, ऋतिक माळवे, सौरव वसाके, मयुर वसाके, कुणाल गुरणुले, आणि समस्त गावकऱ्यांनी श्रमदानातून आज बरेच शी कामे केली.या मध्ये जील्हा परिषद प्राथमिक शाळे च्या परीसर, नाल्या सफाई, समशान भुमी कडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती, गावांतील मुख्य रस्त्यांची सफाई, कचऱ्यावर तणनाशक फवारणी, अशी अनेक कामे करण्यात आली.तसेच आम्ही ही योजना अशीच समोर नेत असताना गावांतील गोर गरीबांचे प्रश्न, शाळे तील विद्यार्थी,विद्यार्थिनी चे प्रश्न, आरोग्य मदत, अशी बरीच कामे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आम्ही आपल्या गावात च  नाही तर गावाजवळच्या ईतर गावात जाऊन हि योजना राबण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तरी यासाठी आम्ही ग्रामस्थांना आवश्यक असलेली मदत करावी अशी इच्छा व्यक्त करीत आहे.

Comments