*"एक पेड माॅं के नाम" उपक्रमा अंतर्गत विवेकानंद नगर येथे वृक्षारोपण* *राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विवेकानंद महाविद्यालयाचा उपक्रम*

*"एक पेड माॅं के नाम" उपक्रमा अंतर्गत विवेकानंद नगर येथे वृक्षारोपण* 

*राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विवेकानंद महाविद्यालयाचा उपक्रम*

अतुल कोल्हे भद्रावती :-

               स्थानिक विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. १२ जुलै २०२४ ला सकाळी १०.०० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आस्टूनकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. जयवंत काकडे, प्राध्यापक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून  महाविद्यालयातून वृक्ष दिंडी विवेकानंद नगर परिसरात काढण्यात आली. वृक्ष दिंडीचा समारोप विवेकानंद महाविद्यालय समोरच्या मंदिर परिसरातील पटांगणात करण्यात आला. यावेळी परिसरातील भजन मंडळाच्या माध्यमातून "एक पेड माॅं के नाम" या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये बेल, कवट, आपटा, सिसम, जांभूळ, पिंपळ, आवळा आदी वृक्षाचा समावेश होता. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, नागपूर विभाग, अध्यक्ष, विजयकुमार जांभूळकर यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,  यांनी मातृत्व व पर्यावरण यांचा संबंध जोडून वाढत्या प्रदूषणाविषयी जनजागृतीचा संदेश दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता बांबोडे, तर आभारप्रदर्शन डॉ. जयवंत काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्पमित्र व वन्यजीव संरक्षण समिती सदस्य, श्रीपाद बाकरे तसेच विवेकानंद नगर येथील सौ. प्रज्ञा वांधिले, सौ.मेघा क्षीरसागर, सौ. संगीता वाढई,सौ.चंद्रकला सातपुते, श्रीमती वनिता गायकवाड, सौ. गीता देठे, ज्योत्स्ना पारखी, सौ. आशा बोढाले, सौ. अरुणा जुनघरे, सौ. सौ. माया पारखी, सौ. अश्विनी चरडे,सौ. कल्याणी ताजणे, सौ. मंजुषा आस्वले, सौ. ममता आसुटकर, सौ. भारती आसुटकर, सौ.अल्का डोये, सौ. सुंदर्गिरी आदी महिला भजन मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments