*भद्रावती तालुक्यातील कचराळा येथील घटना*
अतुल कोल्हे भद्रावती :-
शेतातून बैलबंडी घेऊन आपल्या घराकडे जात असता रस्त्यात रानडुकरांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात एका 54 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कचराळा गावातील शेत शिवारात घडली. मधुकर नारायण येरगुडे, वय 54 वर्ष राहणार कचराळा असे या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकरी हा सायंकाळच्या सुमारास शेतातून आपल्या घराकडे येत असताना रस्त्यात रानडुकरांचा एक कळप आडवा आला. अचानक आडवा आलेल्या कळपामुळे मधुकर येरगुडे यांचे संतुलन जाऊन ते बैलबंडी वरून खाली पडले असता रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जबर जखमी केले. गंभीर अवस्थेत त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment