अतुल कोल्हे भद्रावती :-
शिवसेना उबाठाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील घोडपेठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत घोडपेठ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पेपर बोर्डचे वितरण सभापती भास्कर ताजणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लगतच्या निंबाळा येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख तुमराम, मुख्याध्यापिका उरकुडे, वडेट्टीवार मॅडम, रगटाटे मॅडम, भाग्यश्री केराम, सुजाता खडके, परमेश्वर ताजने, प्रकाश देवतळे, देवेंद्र रामटेके, सुनील चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संतोष इखारे, मदन शेरकी, प्रवीण ताजने, राजू भोंगळे, प्रकाश पिंपळकर, रवी माणूसमारे आदींनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment