आतील कोल्हे
नाल्याच्या पुलावर पुराचे पाणी असतांना पुलावरुन ट्रक पुढे नेत असतांना चालकाचा अंदाज चुकल्यामुळे एक ट्रक पाण्यात वाहुन गेल्याची घटना चंदनखेडा गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नाल्याच्या पुलावर घडली.गोविंदसींग पदमसींग असे चालकाचे नाव असुन मच्छीमारांनी लगेच बाहेर काढल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले.या घटनेची माहिती शेगाव पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर सर्वप्रथम शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार यादव हे घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती घेतली.गोविंदसींग पदमसींग हा एच.आर.१७३बी४७८६ क्रमांकाचा ट्रक घेऊन भद्रावतीवरुन चंदनखेडा मार्गे शेगावकडे जात असता दरम्यान सदर पुलावर पुराचे पाणी असतांना त्याने ट्रक पुढे नेण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याचा अंदाज चुकल्यामुळे ट्रक नाल्यात कोसळला.सुदैवाने नाल्यात मच्छीमारी करीत असलेल्या मच्छीमारांनी ट्रक चालकाला सुखरुप बाहेर काढले.ट्रक मात्र पुरात वाहुन गेला.
Comments
Post a Comment