शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचे व्दारा जनतेला जाहीररीत्या आवाहन .आपात्कालीन परिस्थितीसाठी शिवसैनिकांनी तत्पर राहावे.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचे व्दारा जनतेला जाहीररीत्या आवाहन .

आपात्कालीन परिस्थितीसाठी शिवसैनिकांनी तत्पर राहावे.

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 
चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असुन शेतकरी बांधवांच्या शेतीचे, घरांचे, गोठा, जनावरे, पाळीव प्राणी आदींचे नुकसान झाले आहे. धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. तरी नदी, नाल्या जवळच्या गावांना, रहीवास्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्या. सुरक्षित स्थळी कुटुंब व जनावरे हलवा, वन्य जीवांपासून सावध रहा, पाणी गरम करुन प्या, आरोग्याची काळजी घ्या, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा.
विशेषत: वरोरा, भद्रावती तालुका प्रशासनासोबत आम्ही संपर्कात आहोत, आमचे सहकार्य राहील. आमचा 'एक हात मदतीचा' हा उपक्रम सुरूच आहे. आत्मविश्वास बाळगा... आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. 

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख यांनी भविष्यात उद्भवणाऱ्या आपातकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेत जनतेच्या मदतीसाठी तत्पर रहावे, कोणत्याही अतीआवश्यक मदतीकरिता माझ्याशी संपर्क साधावा.

सन २०२२ मध्ये जिल्ह्यात आलेल्या पुर परिस्थितीवर आपण सर्वांनी मात केली होती. तसाच आत्मविश्वास बाळगा, या सकंटावर सुध्दा आपण सारे मिळून मात करू या पद्धतीचे आव्हान रवींद्र शिंदे यांनी केले आहे.


संपर्क :रविंद्र शिंदे जिल्हाप्रमुख
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
9823752077

Comments