लाडका विद्यार्थी योजना गावखड्यांमध्ये राबवा बोडखा येथील विद्यार्थ्यांची मागणी.पुरामुळे बोडखा मोकाशी येथील विद्यार्थी व गावकरी त्रस्त.

लाडका विद्यार्थी योजना गावखड्यांमध्ये राबवा
 बोडखा येथील विद्यार्थ्यांची मागणी.

पुरामुळे बोडखा मोकाशी येथील विद्यार्थी व गावकरी त्रस्त.

वरोरा 
चेतन लुतडे

चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव मुठीत घेउन तुडुंब पाण्याने भरलेला पुलावरून घरी जाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. आपल सरकार मोठ मोठया योजना काढत आहे पण ग्रामीण भागतील शालेय विद्यार्थी साठी लाडका विद्यार्थी योजना काढण्याची गरज आहे. 
बोडखा या परिसरात विद्यार्थ्यांसाठी कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही कधी बस वेळेवर नाही तर शहरात वस्तीगृहात जागा नाही. बोडखा व आजूबाजूच्या गावातून दहा किलोमीटर जाऊन खांबाडा या ठिकाणावरून महामार्गावर येऊन  गाडी पकडावी लागते. त्यानंतरच महाविद्यालयात किंवा शाळेत जाता येते. शाळेतून घरी परत येताना पूर्ण दिवसच प्रवासात चालला जातो. अशा बिकट परिस्थितीत बरेच विद्यार्थी आपले शिक्षण अपुरे सोडून देतात. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत यांनी व्यक्त केले आहे.
कोसरसार ते बोडखा मार्गावर बऱ्याच कालावधीपासून जुनाट झालेल्या पुलामुळे विद्यार्थ्यांची स्थिती बिकट झाली आहे. या पुलावरून अंदाजे 25  वर्षांपासून बोडखा ग्रामस्थ जाणे- येणे करतात. दरवर्षी मुसळधार पावसाने लगेच पाण्याची पातळी वाढून पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे बोडखा मोकाशी गावाला जाण्या येण्यासाठी गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करून गावात यावे लागते. बोडखा गावातील शालेय विद्यार्थी कोसरसार व वरोरा शहरातील शाळेमध्ये  शिक्षण घेत असुन विद्यार्थीला गावाला जाण्यायेण्यासाठी  हा एकच रस्ता आहे. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहा मधून मार्ग काढत मागील कित्येक वर्षापासून गावकरी जातयेत आहे. अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थीला पुल ओलांडताना अपघात झाला तर प्रशासन जबाबदार असणार काय? असा संवाल उपस्थित झाला आहे.
वारंवार प्रशासनला, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी,  बांधकाम विभागाला  माहिती देऊन सुद्धा पुलाचे बांधकाम, नाल्याचे खोलीकरण, रोडचे बांधकाम अजून पर्यंत झाले नाही. शालेय विद्यार्थीचे पालक कुणाकडे मदत मागायची असा प्रश्न पडला आहे.मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गाव खेड्यामध्ये भोंगे फिरतात. मात्र अशावेळी गावकऱ्यांच्या मदतीला कोणीच येत नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. 
येणाऱ्या विधानसभेमध्ये बोडखावाशियांनी जागृत राहून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडावे अशी इच्छा शिक्षित बालकांनी व्यक्त केली आहे.

Comments