खापरी येथील रस्ते व नाल्यांची दुरअवस्था**वार्डवासीयांची नवीनिकरण करण्याची मागणी : न. प. मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*
*वार्डवासीयांची नवीनिकरण करण्याची मागणी : न. प. मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*
अतुल कोल्हे भद्रावती :-
शहरातील खापरी वार्ड ते महामार्गापर्यंत असलेला कच्चा रस्ता पावसाळ्याच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी खराब झाला असून या रस्त्यावर चिखल व पाणी साचून असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागात केपीसीएल कंपनी द्वारा वसाहत जवळील खोदण्यात आलेल्या नालीमुळे पावसाचे पाणी या नाल्यात जात असुन वार्डात व नागरिकांच्या घरात शिरत आहे. याचा कमालीचा त्रास वार्डातील नागरिकांना होत आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन हा रस्ता नव्याने बनवून पाणी जाण्यासाठी योग्य नाली तयार करावी अशी मागणी खापरी वार्डतील नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. वार्डात पावसाच्या पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट होत नसल्याने या रस्त्यावर व वार्डातील सखल भागात पाणी साचलेले आहे. रस्त्यावरही घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता खराब झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे व पायी चालणे सुद्धा जिकरीचे झाले आहे. त्यामुळे खापरी वार्ड तसेच मल्हारी बाबा सोसायटीतील नागरिकांना व शाळेच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. हे निवेदन सादर करताना खापरी वार्डातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment