कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा मध्ये 46 लाखाचा तारण घोटाळा .चौकशी समितचा अहवालानुसार कारवाई करणार. उपसभापती

कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा मध्ये 46 लाखाचा तारण घोटाळा .

चौकशी समितचा अहवालानुसार कारवाई करणार. उपसभापती

फक्त बातमी..
वरोरा 13 Aug 2024
चेतन लुतडे 

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा वेगळ्या कारणाने  चर्चेत आहे. या पहिले कांदा घोटाळा प्रकरणात चर्चेसाठी आलेली बाजार समिती. आता नवीन वादात फसली आहे. 
सन 2022 ते 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या तारन योजनेत खोट्या  एंट्री करून  46 लाख 62 हजार 190 रुपयाची उचल झाल्याची घटना बाजार समितीच्या बैठकीदरम्यान उघडकीस आली आहे.
दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ऑडिट करण्यात येते. मात्र यामध्येही बाब उघडकीस आली नव्हती. मात्र टेबल वरचे पर्यवेक्षक बदलल्याने नवीन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळती झाल्याची बाब उघडकीस आली. यामध्ये लिपीक , सचिव , पर्यवेक्षक आणि  सभापतीच्या ठरावानंतर  शेतकऱ्यांच्या तारण योजनेतील यादीमध्ये 75% पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाते. हि यादी बनवताना खोट्या शेतकऱ्याचे नाव दाखल करून दहा वेळा शेतकऱ्याच्या तडसे, कळसकर, कूळमेथे यांच्या खात्यात पैसे वळते  करून शेतकऱ्याच्या संगणमतीने  पर्यवेक्षकांने शेतकऱ्याकडून पैसे काढल्याचा आरोप बाजार समितीकडून करण्यात आला आहे. 
या संबंधात बाजार समितीने चौकशी समिती नेमली असून अजून पर्यंत पूर्ण तपास होणे बाकी आहे. सध्याचे विद्यमान सभापती विजय देवतळे व जयंत टेंमूर्डे यांनी समितीचा चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
 

तारण म्हणजे काय असते.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चना, सोयाबीन, तूर या पिकांसाठी बाजार समितीमध्ये ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असते. बरेच शेतकरी  भाव कमी असल्यामुळे विक्री करत नाही. आपले सर्व पीक बाजार समितीकडे तारांनी योजनेत ठेवते. जेव्हा जास्त भाव येईल त्या दिवशी तो विकला जातो. 
यादरम्यान शेतकऱ्याला पैशाची गरज भासल्यास शेतकरी बाजार समितीकडून हमीभावाच्या 75% मोबदला उचलत असतो. 25% उर्वरित रक्कम पूर्ण माल विकल्यानंतर बाजार समितीकडून घेत असतो.

ज्या शेतकऱ्याला पैसे पाहिजे असल्यास लिपीक अर्जानुसार यादी तयार करतो. त्या नावांची लिस्ट समिती पुढे आल्यानंतर सभापती सचिव यांच्या सहीने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते केल्या जातात. 

याचाच फायदा घेऊन चुकीच्या शेतकऱ्याचे नाव टाकून संगणमताने पर्यवेक्षकाने पैसे घेतल्याचे प्रथमदर्शनी बाजार समितीला दिसल्याने. तपासणी सुरू केली होती. यामध्ये गैरव्यवहार आढळल्याने पुढील तपास सुरू आहे.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, उपसभापती जयंत टेंमूर्डे यांनी प्रतिनिधीशी बोलताना बाजार समिती या संबंधित घटनेत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही असा कडक ईशारा दिला आहे.

Comments