प्रोत्साहनपर लाभासाठी 7 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक**महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना*



*प्रोत्साहनपर लाभासाठी 7 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक*
*महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 16 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2019  अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अंमलात आलेली असून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या 13 ऑगस्ट 2024 च्या पत्रानुसार, प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या 33356 शेतकऱ्यांसाठी महा-आयटीने 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सदर कालावधीत संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा एस.एम.एस. संबंधित शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत देण्यात आला आहे. तथापी याबाबत संबंधित बँकांनी देखील योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना व्यक्तीश: कळविणे आवश्यक आहे. त्यादृष्टिने त्वरीत कार्यवाही करावी. चंद्रपूर जिल्ह्यातील सदर योजनेअंतर्गत पात्र असलेल्या खातेदारांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, या कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.
००००००

Comments