*75- वरोरा विधानसभा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)**विधानसभा क्षेत्र वरोरा व भद्रावती येथे निषेध मोर्चाचे आयोजन**तहसीलदार व पोलीस निरिक्षकांना महिला आघाडीनी दिले निवेदन*
*विधानसभा क्षेत्र वरोरा व भद्रावती येथे निषेध मोर्चाचे आयोजन*
*तहसीलदार व पोलीस निरिक्षकांना महिला आघाडीनी दिले निवेदन*
चेतन लुतडे वरोरा
७५ वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पुर्व विदर्भ संर्पक प्रमुख आमदार भास्कर जाधव साहेब, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाशजी वाघ साहेब व महीला आघाडी चंद्रपुर जिल्हा सर्पक प्रमुख सुषमाताई साबळे यांचे मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर जिल्हा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने जिल्हा सघंटीका सौ. नर्मदा बोरेकर, वरोरा येथे शहर प्रमुख खेमराज कुरेकार, वरोरा विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, उपजिल्हा प्रमुख युवासेना शरद पुरी तसेच भद्रावती येथे भद्रावती तालुका प्रमुख सौ. आशाताई ताजने, उपतालुका प्रमुख सौ. शिलाताई आगलावे, भद्रावती शहर समन्वयक सौ. भावनाताई खोब्रागडे, महीला आघाडी माजी तालुकाप्रमुख श्रीमती वर्षाताई राजेश ठाकरे यांच्या नेत्तृत्वात राज्यात होत असलेला महिला, युवती, अल्पवयीन बालीका यांच्यावरील लैगिंक अत्याचाराच्या निषेधार्थ महिला सुरक्षिततेकरिता या षंढ, कुजकामी आणि झोपी गेलेल्या मिंधे आणि फसनवीस सरकारला जाग आणण्यासाठी संवेदनशील विषयासंबंधाने सरकारच्या भुमिकेविरोधात निषेध नोंदवीत वरोरा व भद्रावती येथील तहसिलदार व पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी वरोरा तालुका व शहरात “शिवालय” कार्यालय तसेच भद्रावती तालुका व शहरात “शिवनेरी” कार्यालय ईथून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वरोरा येथे महीला आघाडीच्या तालुका शहर संघटीका शुभांगी अहिरकर शुभांगी धवने, तेजस्विनी चंदनखेडे, मुक्ता हजारे, संगिता मेश्राम, वर्षा पिंपळशेंडे तसेच भद्रावती येथे महीला आघाडीच्या सौ. रुपाली साखरकर, वदंना बडवाईक, प्रगती शिदे तसेच महीला पदाधिकारी व बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत निषेध मोर्चा काढण्यात आला.
Comments
Post a Comment