*समाजाची मी सदैव आभारी राहील- खासदार प्रतिभा धानोरकर*

*समाजाची मी सदैव आभारी राहील- खासदार प्रतिभा धानोरकर*

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 

समाजातील सर्व घटकांनी मला सहकार्य केल्याने, मी आज या पदावर विराजमान झाली आहे. सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नसल्याची भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर व मुल येथील सकल कुणबी समाजाच्या सत्कारावेळी व्यक्त केली. 

मला समाजातील सर्व घटकांनी मदत केली आहे. दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निवडणूकीच्या वेळी देखील लोकसभा क्षेत्रातील इतर समाजासह कुणबी समाजाने प्रामुख्याने महत्वाची भुमीका बजावल्याने दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर व मी स्वतः या पदावर विराजमान झाले. त्यामुळे मी समाजाचे सदैव आभारी राहणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहात आयोजित सत्काराच्या वेळी केले. यासोबतच मुल येथे देखील सकल कुनबी समाजाच्या वतीने खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सदर सत्कार हा फक्त माझा नसुन मला खासदार बनविण्यासाठी काम केलेल्या समाजातील सर्वांचा असल्याचे मत देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी खासदार धानोरकर यांनी सांगितले.

Comments