भद्रावती - वरोरा विधानसभेवर शिवसेना शिंदे गटाचा दावा**अड. युवराज धानोरकर व नितीन मत्ते यांची नावे चर्चेत.*

*भद्रावती - वरोरा विधानसभेवर शिवसेना शिंदे गटाचा दावा*

*अड. युवराज धानोरकर व नितीन मत्ते यांची नावे चर्चेत.*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                विधानसभा निवडणुक अगदी तोंडावर आलेली आहे. या पार्श्वभुमीवर सगळ्याच प्रमुख पक्षातील  हालचालींना वेग येऊ लागला आहे. वरवर जरी महाआघाडी व महायुती दिसत असली तरी सध्यास्थितीत आघाडी व युतितील घटकपक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे दिसुन येत आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रावर आपला दावा ठोकला असुन पक्षाचे निरीक्षक जिल्ह्यात तळ ठोकुन निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी मतदार संघात चाचपणी सुरु केली आहे. शिंदे गटातर्फे संभाव्य उमेदवार म्हणुन पक्षाचे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांची नावे चर्चेत येऊ लागली आहे. आमदार कृपाल तुमाने यांची पक्षातर्फे जिल्हा निवडणुक प्रभारी म्हणुन नियुक्ती करण्यात आल्याने येथील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. 
तुमाने यांच्या भद्रावती भेटीत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना हा मतदार संघ शिवसेनेसाठी कसा पुरक आहे हे समजवून सांगितल्यानंतर तुमाने यांनी हि जागा पक्षाला मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने येथील पक्षकार्यकर्त्यांच्या व त्याबरोबरच इच्छुक उमेदवारांच्या आशा ऊंचावल्या आहेत. मागील युतीमध्ये येथील जागा शिवसेनेच्या वाट्याला होती. मात्र राजकीय घडामोडीनंतर या ठिकाणी भाजपही दावा ठोकणार हे निश्चित आहे. या क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाची ताकद तेवढीशी नाही. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला, लाडकी बहिन योजना, शेतकऱ्यांना देण्यात आलेली कृषीपंपाची विजमाफी, विद्यावेतन योजना या सर्वांच्या बळावर येथे आपली नौका सहजतेने पार होईल अशी येथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आशा आहे. त्यामुळे या क्षेत्राची जागा आपल्या पक्षालाच मिळावी असा पक्षाचा आग्रह दिसुन येत आहे. अड. युवराज धानोरकर यांनी अलीकडेच शिंदे गटात प्रवेश करुन ते पक्षाच्या जिल्हा संघटक पदावर कार्यरत झाले आहे. आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळाल्यास आपण ताकदीने निवडणुक लढु असे त्यांनी जाहिर केले आहे व ते कामालासुध्दा लागले आहे. लहानमोठ्या माध्यमातून त्यांचा मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिसुन येत आहे. पक्षाला जागा मिळाल्यास ते ऊमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत. याशिवाय जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नावाचीही चर्चा जोर धरु लागली आहे. राजकारणात त्यांचा मोठा अनुभव असल्याने तेसुध्दा ऊमेदवारीचे दावेदार समजल्या जात आहे. येत्या काही काळात भद्रावती -वरोरा विधानसभेची जागा महायुतीच्या जागावाटपात कोणाला मिळेल हे चित्र स्पष्ट होईल. मात्र सध्यातरी शिवसेना शिंदे गटाची येथील जागेवर नजर असुन त्यादृष्टीने त्यांच्या अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

Comments