शेतकऱ्यांच्या सुखदुःखात धावून येणारे राजूभाऊ चिकटे शेतकऱ्याचे खरे कैवारी.या शेतकरी पुत्राला विधानसभेवर नक्की पाठवणार.

शेतकऱ्यांच्या सुखदुःखात धावून येणारे राजूभाऊ चिकटे शेतकऱ्याचे खरे कैवारी.

या शेतकरी पुत्राला विधानसभेवर नक्की पाठवणार. 

वरोरा 
चेतन लुतडे 

जाहिरात
आज दि 12Aug 2024 रोज सोमवार ला शेकोटी मुळे गोट्याला लागलेल्या आगीत गोट्यात बांधलेल्या  वासुदेव सीताराम शेंडे यांचे बैल जखमी झाले तर जनार्धन सीताराम शेंडे यांचा एक बैल मूत्यू झाला तर काही जनावरे जखमी झाले, आणि शेती उपयोगी वस्तू आणि जनावरचे वैरण पूर्ण पणे जळले .तर संबंधित घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तसेच विदमान संचालक  राजू भाऊ चिकटे हे शेतकर्यांची बिकट परिस्थिती पाहून तात्काळ भेटीसाठी आले. शेतकऱ्याची परिस्थिती पाहून तात्काळ आर्थिक सहाय्य करत शेतकऱ्याची मदत केली. यापुढेही त्यांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या पहिले सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून तात्काळ मदत करणारे राजूभाऊ चिकटे या परिसरात शेतकऱ्यांचे कैवारी ठरत आहे. या विधानसभेत शेतकरी पुत्र म्हणून नावलौकिक झालेले राजूभाऊ शेतकऱ्यांसाठी विधानसभेचे नेतृत्व करणार असा ठाम विश्वास शेतकऱ्यांनी केला आहे.
या वेळी श्री जनार्धन शेंडे शेतकरी, श्री वासुदेव शेंडे शेतकरी तर श्री राजू भाऊ चिकटे, कृषि उत्पन्न बाजार समिती माजी सभापती, सौ किरण नंदकुमार ढोक सरपंच पाचगाव ठा,श्री किशोर डुकरे सामाजिक कार्यकर्ते,  श्री पिंटू भाऊ सातपुते, सचिन भोयर, श्री राजेश राठोड ग्रामसेवक, श्री गुरुदेव तळवेकर तलाठी पाचगाव, ड्रा सतीश अघळते साहेब पशु वैदकीय अधिकारी तसेच गावातील नागरिक हजर होते तसेच पीडित शेतकरी यांच्या पाठीशी उभे राहून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पंचायत समिती मार्फत आर्थिक मदत मिळवून देणार अशी ग्वाही दिली.

    शिर्डी येथे एक सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अधिवेशन

Comments