माढेळी व इनर्व्हिल वरोरा तर्फे पशुसंवर्धन पंधरवाडा अंतर्गत तालुकास्तरीय राष्ट्रीय पशुधन अभियान कार्यशाळेचे आयोजन
माढेळी व इनर्व्हिल वरोरा तर्फे पशुसंवर्धन पंधरवाडा अंतर्गत तालुकास्तरीय राष्ट्रीय पशुधन अभियान कार्यशाळेचे आयोजन
वरोरा माढेळी
चेतन लुतडे वरोरा
दिनांक 15/08/2024 रोजी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 , माढेळी व इनर्व्हिल क्लब ऑफ वरोरा तर्फे पशुसंवर्धन पंधरवाडा अंतर्गत तालुकास्तरीय राष्ट्रीय पशुधन अभियान कार्यशाळेचे आयोजन , पशुपालकांना विविध योजना विषयी माहिती, पशु पालकांना वैरण बियाणे वाटप व शेती उपयोगी अवजारे याची वितरण करण्यात आले.
कार्यशाळेचे मुख्य उद्देश राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत पुष्पलकांमध्ये उद्योजकता निर्माण व विकास करणे हे होते.
कार्यशाळेचे उद्घाटन सौ. दिपाली माटे, अध्यक्ष, इनरव्हील क्लब ऑफ वरोरा. यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यशाळेचे अध्यक्षस्थन माननीय डॉ. देवेंद्र भाऊ महाजन सरपंच माढळी यांनी भूषवले,कार्यशाळेत प्रमुख अभिकृती व पाहुणे म्हणून डॉ. दिलीप देशमुख , सहाय्यक आयुक्त तालुका लघु पशुचिकित्सालय वरोरा डॉ. माधवी गोंगले, पशुधन विकास अधिकारी माढेळी व डॉ. राहुल शेंदरे पशुधन विकास अधिकारी
(विस्तार )पंचायत समिती वरोरा यांनी भूषवले.
त्याचप्रमाणे महेश देवतळे ग्रामपंचायत सदस्य, राजूभाऊ सवयी ग्रामपंचायत सदस्य, अमोल भाऊ काटकर ग्रामपंचायत सदस्य, बाळूभाऊ ढेंगळे सामाजिक कार्यकर्ते, अजयजी कटाईत ग्राम विकास अधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमात प्रामुख्याने इनरव्हील क्लब वरोराच्या सौ. स्नेहा जौदंड, उपाध्यक्ष. सौ.सुचिता पदमावार कोषाध्यक्ष , सौ.किरण जाकोटीया cc., तसेच सौ कविता बाहेती, सौ. सीमा लाहोटी, आणि सौ.नीलिमा गुंडावार या उपस्थित होत्या.
सदर कार्यशाळेत एकूण 110 पशुपालकांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे संचालन डॉ. राहुल शेंदरे
यांनी केले. सदर तालुकास्तरीय कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता डॉ. दिलीप देशमुख, डॉ. राहुल शेंद्रे, डॉक्टर माधवी गोंगले, यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे श्री नागेश ठोंबरे, पशुधन पर्यवेक्षक सोइट, श्री धनराज मेश्राम सहाय्यक पशुधन विकास अधिकारी चिकणी यांचा नियोजन करण्यामध्ये मोलाचा वाटा होता.
त्याचप्रमाणे सदर कार्यशाळेमध्ये 50 गोपालकांना वैरण बियाणे वाटप व ठोंबे वाटप, गोचीड गोमशा निर्मूलन औषधी, जंतरनाशक वाटप व इनरव्हिल तर्फे शेती उपयोगी अवजारे वाटप करण्यात आली.
कार्यशाळेची सांगता व आभार प्रदर्शन डॉ. माधवी गोंगले यांनी केले.
Comments
Post a Comment