काशीमाय देवस्थान चिरादेवी येथील शिव शंकर मंदीरात चक्क नागाचे दर्शन**नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगासारखे आकार असलेल्या नागांचे भाविकांनी घेतले दर्शन*
*नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगासारखे आकार असलेल्या नागांचे भाविकांनी घेतले दर्शन*
अतुल कोल्हे भद्रावती :-
तालुक्यातील चिरादेवी येथे निसर्ग रम्य वातावरणात तयार केलेले प्रभू शिव शंकराचे मंदिर आहे. श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचे सण म्हणजे नागपंचमी, नागपंचमीचा इतिहास थोडक्यात सांगायचं झाल्यास कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी म्हणून साजरा केला जातो.
चिरादेवी येथील काशीमाय देवस्थान येथे आज नागपंचमी निमित्ताने भाविक दर्शनासाठी जात असताना मंदिरामध्ये चक्क शिवलिंग आकारासारख्या कवळ्या नागाचे दर्शन झाले. हि घटना आश्चर्य चकीत असून परिसरात नागरिकांना बघावयास मोह आवरेनासा झाला. कारण आजपर्यंत कधीच मंदिरामध्ये नागाचे दर्शन घडले नव्हते. चिरादेवी येथील नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून या मंदिराला ओळखले जाते.
या मंदिराची पाश्वभूमीवर म्हणजे ४० वर्षापूर्वी या ठिकाणी पाण्याचा खड्डा होता. आणि त्या खड्ड्यातून सतत पाणी वाहत असे पूर्वी वाहण नसल्यामुळे कोची,घोनाड ,चिरादेवी येथील लोक बाजाराला पायी भद्रावती ला जायचे. येणारे - जाणारे नागरिक त्या झऱ्याचे पाणी पित होते. मुख्य म्हणजे तो खड्डा बारा ही महिने जसाच्या तसाच भरून दिसत असे. त्यामुळे गावातीलचं स्व. गोंविदा तलांडे यांनी आपल्या कल्पनेतून गायमुख तयार केले आणि तिथेच एक टाकं बांधण्यात आले होते . उन्हाळ्यात जनावरे त्या टाक्यातील पाणी पिऊन ताण भागवत असे. नंतर त्यांनी पिंड वगैरे तयार करून गावकऱ्यांच्या विचार घेऊन १९७६ ला यात्रा सुरू केली. काही वर्षांनंतर तिथे लोकवर्गणीतून शिवशंकराचे मंदिर बांधण्यात आले. आज या ठिकाणाला काशीमाय देवस्थान म्हणून ओळखले जाते.
खरतरं कालांतराने पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाण्याचा झरा कायमस्वरूपी बंद झाला आहे. गायमुख मध्ये सतत पाणी येत असल्याने ते सुद्धा बंद आहे. आता फक्त परिसरात मंदिरचं प्रसिद्ध असल्याने नागरिक रोज त्याठिकाणी ये - जा करतात. आणि आज चक्क नागाचे दर्शन घडल्याने नागरिकांमध्ये श्रद्धा वाढली असून यावर परिसरात तर्कवितर्क बोलल्या जात आहे..
Comments
Post a Comment