कामावर मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना शासकीय मदत द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा , प्रदेश उपाध्यक्ष छोटूभाई शेख
इशारा ,
प्रदेश उपाध्यक्ष छोटूभाई शेख
अपर जिल्हा अधिकारी व सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर यांना निवेदन सादर
वरोरा
चेतन लुतडे
मागील पाच वर्षांपासून आपल्या कार्यालयात येत असल्याने चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणी प्राप्त बांधकाम कामगाराचे कामावर मृत्यू व गंभीर आजारी कामगार व त्याचा वारसांना 5 वर्ष लोटून सुधा आर्थिक मदत मिळालेली नाही . संबंधित विभागाकडून अशा गरजू लोकांची यादी मागवण्यात आली.
1 आरिफ शेख मृथक वरोरा
2 राजू जोगी
3 अरुण चापले
4 गणपत परचाके
5 सय्यद इशाद अली
6 चेतराम पेंदोर
7 पुनाजी बोधलकर
8 ईश्वर गुरनुले
9 भास्कर बोरकुटे
10 सुनंदा रणदिवे
यांच्यासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रकरणं प्रलंबित असून पाच वर्षांपासून त्यांचा वारसणाला कार्यालयात येण्या जाण्याकरिता कामचा माहितीकरिता हजारो रुपये आतापयंत खर्च झाले आहे. ज्या यक्तीने पैसे खरच केले त्याचे काम लवकर होत असून ज्यांनी पैसे दिले नाही त्याचे काम प्रलंबित वर्षानुवर्ष ठेवण्यात येत आहे.
जाहिरात
सामाजिक कार्यकर्ते काशीफ खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एकीकडे सरकार बोगस कामगार नोंदण्या करून रोजगार दिल्याचे दाखवीत आहे. दुसरीकडे काम करत असताना मृत्यू झालेल्या अनेक कामगाराच्या वारसनाला पैसे न मिळाल्यामुळे त्यांचा हकाचा आर्थिक मदत योजनेपासून वंचित ठेवत आहे . तरी मृत्यू कामगार आरिफ बसिर शेख वय 27 वर्ष कॉलरी वार्ड , वरोरा मृत्यू दि. 28 मार्च 2019 पाच वर्षापासून वारसान एकटी आई आर्थिक मदतीसाठी भटकत आहे .या प्रकरणासह मागील पाच वर्षांपासून प्रलंबित सर्व प्रकरण पंधरा दिवसांचा आत मार्गी लावून गोर गरीब पीडित मृत्काचा वारसांना आर्थिक मदत देण्यात यावे अन्यता सोळाव्या दिवशी मृतकाच्या नातेवाईकाला घेऊन सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदन करता काँग्रेस असंघटित कामगार कर्मचारी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रभारी शेख जैरुदीन छोटूभाई व त्यांचे सहकारी जिल्हाध्यक्ष प्रफुल जाधव शहराध्यक्ष मनीष बावणे प्रदेश प्रतिनिधी कमलेश बांबोडे विनोद संकेत महिला जिल्हाध्यक्ष शालिनी भागात सय्यद अलीम भाई जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट सुनिता पाटील मेहबूब भाई प्रवीण शेगावकर प्रगती भोसले महिला जिल्हा उपाध्यक्ष रिजवान रंगरेज व इतर सुद्धा पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित निवेदनाची प्रत पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार विरोधी पक्ष नेते विजय भाऊ वडेट्टीवार खासदार प्रतिभाताई धानोरकर व कामगार मंत्री यांना पाठवण्यात आले
सदर मागण्या चे निवारण वेळेच्या आत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आज भाजपा महिला मोर्चा वरोरा शहर व ग्रामीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रक्षाबंधन कार्यक्रम सागर वझे यांच्या कार्यालयात दुपारी बारा वाजता पासून घेण्यात येत आहे. हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे करावे.
Comments
Post a Comment