बारा ज्योतिर्लिंग चार धाम यात्रा सायकल ने पूर्ण करणाऱ्या मयूर चा बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद वरोरा तर्फे सत्कार
बारा ज्योतिर्लिंग चार धाम यात्रा सायकल ने पूर्ण करणाऱ्या मयूर चा बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद वरोरा तर्फे सत्कार
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथील रहिवासी असलेला मयूर महादेव देऊरमल्ले हा युवक सायकल ने प्रवास करीत 12 ज्योतिर्लिंग ,चारधाम यात्रा पूर्ण करत घरी परतताना वरोरा येथील हनुमान मंदिर यात्रा वॉर्ड येथे विश्व हिंदू परिषद,बजरंग दल वरोरा तर्फे त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सहा महिन्यांपूर्वी घरून निघताना 12 ज्योति्लिंगां चार धाम यात्रा पूर्ण करण्याचा निश्चय करत सहा महिन्यात श्री शैलम ,मल्लिकांर्जून , रामेश्र्वरम , वैजनाथ , काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर ,घृष्णेश्वर , केदारनाथ ,महाकालेश्वर ,ओंकारेश्वर ,चार धाम मधील द्वारका ,जगन्नाथ पुरी ,रामेश्वर ,बद्रीनाथ असा एकूण 18000 किलोमीटर चा प्रवास सायकल ने पूर्ण केला .सायकल ने प्रवास करताना खूप मेहनत घ्यावी लागली परंतु ईश्वरीय आशीर्वादाने हे सर्व शक्य झाल्याचे मयूर ने सांगितले .
मयूर सायकल वाला म्हणून समाज माध्यमांवर प्रसिद्ध
इंस्टाग्राम मध्ये मयूर सायकल वाला हा आपल्या प्रवासातील प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ टाकत पूर्ण 12 ज्योति्लिंगां व 4 धाम यात्रा पूर्ण केली त्यामुळे प्रसिध्दी देखील मिळाली.
त्या निमित्य विश्व् हिंदू परिषद बजरंद्ल् अध्यक्ष विजय जुनघरे,चेतन जीवतोडे,वैभव ठाकरे,शुभम गोल्हार,बाला चांभारे,तेजस लोहकरे,रोहित पिंपळशेंडे,ओम कांबळे चेतन निकोडे आकाश काकडे अन्य सर्व सदस्य उपस्तित होते
Comments
Post a Comment