चेतन लुतडे वरोरा
वरोरा-चला बदल घडवुया या उपक्रमा अंर्तगत डाॅ.चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन माढेळी येथे दिनांक ११ ऑगस्ट २०२४ ला मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात होते. या शिबीराला माढेळी ,पवनी,जळका,येवती,वाघनख,सोईट,निलजई,आमडी,
बोरी,पांझुर्णी, या गावातील १०००नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.
या कार्यक्रमाचे उदघाटन मा.देवानंद महाजन,सरपंच माढेळी यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.चेतन खुटेमाटे होते या कार्यक्रमाला प्रमुख मा.गणेश माटे,सरपंच बोरी,मा.प्रदिप पाल उपसरपंच आमडी,मा.वनिताताई हुलके उपसरपंच, माढेळी. मा.सुगंधाताई बोढाले सामाजीक कार्यकर्ता जळका हे मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक संकेत गोहकार. संचालन चंद्रशेखर झाडे,आभार प्रदर्शन कुणाल तुराणकर यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय चंद्रपूरची सर्व टिम व संदिप सोनेकर,प्रशांत बोढाले,भास्कर मोर्हुले,कीशोर जगताप,रामभाऊ ताजणे,नितेश बोढाले,कार्लेकर,प्रविण वासेकर,शुभम चिमूरकर,भोजराज ठाकरे,ब्रम्हानंद कुळसंगे,ग्राम पंचायत माढेळी व ग्रामस्थांनी अथक प्रयत्न केले.
जाहिरात
श्रमिक पत्रकार संघातर्फे प्रथम क्रमांकाचा ग्रामीण वार्ता पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, मत्स्य व संस्कृतिक मंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते दैनिक पुण्यनगरीचे वरोरा तालुका प्रतिनिधी *अनिल पाटील* यांना प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
Comments
Post a Comment