मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीना शैक्षणीक प्रशिक्षणार्थी म्हणुन नेमणुक

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीना  शैक्षणीक प्रशिक्षणार्थी म्हणुन नेमणुक 

सरकारने युवकांसाठी उचलले नवीन पाऊल 

फक्त बातमी 
चेतन लुतडे वरोरा 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांचे शैक्षणीक पात्रतेनुसार शासकीय/ निमशासकीय आस्थापना, खाजगी / सार्वजनिक क्षेत्रातील उदयोग, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, सेवा क्षेत्रांतर्गत खाजगी / सार्वजनिक आस्थापना / कंपन्या / उपक्रम / संस्था येथे प्रशिक्षणार्थी म्हणुन नेमणुक देण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्हयातील पात्र उमेदवारांचा प्रशिक्षणार्थी म्हणुन नेमणुक देण्याकरीता मेळावा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक 23/08/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजीत केला आहे. त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार 
1) 12 वी पास प्रतिमाह विद्यावेतन रु. 6000/- 
2) आय टि आय / पदवीधर
प्रतिमाही विद्यावेतन रु. 8000/- 
3) पदवीधर / पदव्युत्तर प्रतिमाह विद्यावेतन रु. 10,000/- राहणार आहे.

करीता 12 वी पास, आय टि आय, कोणत्याही शाखेची पदवीका कोणत्याही शाखेचा पदविधर / पदव्युत्तर उमेदवारानी त्याचे शैक्षणिक पात्रता सिध्द करणा-या मुळ प्रमाणपत्रासह वेळेवर उपस्थित राहावे.

Comments