जनतेला दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला.जिल्हाप्रमुख नितीन मत्ते .मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधन सणानिमित्त तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा.


जनतेला दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला.
जिल्हाप्रमुख नितीन मत्ते

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधन सणानिमित्त तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा.

वरोरा 
चेतन लुतडे 

चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख नितीन मते यांच्या नेतृत्वात महिला कार्यकर्त्यांनी  मुख्यमंत्र्यांना राखी पाठवून आभार व्यक्त केले आहे.



शिंदे गटातील शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून लाडक्या बहिणीला राखी घेऊन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधायला पाठवले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातून उमेद आणि शिवसेना महिला कार्यकर्ता मुंबई येथे ट्रॅव्हलर करून रवाना झाले आहेत. यावेळी वरोरा शहरातून ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बहिणीला राखी व मिठाई घेऊन पाठविण्यात आले.  

जाहिरात 
  राखीच्या सणाच्या पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने 3000 रुपये महिलांच्या खात्यात टाकून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना भेट दिली आहे. प्रत्येकी दीड हजार रुपये महिना महिलांच्या खात्यात सरकार देणार अशी घोषणा त्यांनी केली होती.  यानंतर रक्षाबंधनाची भेट म्हणून दोन महिन्याचे पैसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहे.
त्यामुळे या सर्व बहिणीं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी मुंबईला रवाना झाल्या आहे. 

या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मते, शिवसेना शहरप्रमुख राजेश डांगे ,युवा सेना प्रमुख भूषण बुरेले, जिल्हाप्रसिद्धीप्रमुख आशिष जी ठेंगणे ,विधानसभा समन्वयक विलासजी परचाके, उपशहर प्रमुख जितेंद्र असे कर, सौरभ झाडे ,रोहनजी खनके, सुधाकर कुंकुले, मुकेशजी मोरे, तालुकाप्रमुख श्रीकांतजी खंगार, शाखाप्रमुख रवी भाऊ कुमरे, महिला उपजिल्हाप्रमुख कल्पनाताई भुसारी, शोभाताई रुयारकर, जांभुळे ताई ,ज्योती मते, शरयू मते, कमलताई बोधाने, सुमन बुरटकर ,संगीता अडेकर, विमलताई मेश्राम, जानवी मते, संगीता रुयारकर, आशाताई नांदे, सरस्वती नांदणे ,जिजाबाई जांभुळकर, रेखाताई बागडे, विद्या बागडे, गीता ताई हरणे, इत्यादी महिला शिवसैनिक उपस्थित होत्या



Comments