ग्रामपंचायतच्या नविन सचिवाला पदभार देण्यासाठी टाळाटाळ.
तीन गावातील कामे खोळंबली.
गावकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा.
वरोरा
चेतन लुतडे
वरोरा तालुक्यातील सुमठाणा गट ग्रामपंचायतचा कारभार वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. मागील तिन वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये सचिवाची परमनंट नेमणूक नव्हती. मात्र काही दिवसा अगोदरच ही नेमणूक करण्यात आली मात्र नवीन नेमणूक सरपंच आणि सचिव यांनी पदभार न दिल्याने नवीन सचिवाला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
वारंवार निवेदन देऊन सुद्धा या समस्ये कडे सचिव आणि सरपंच दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सचिव आणि सरपंच गावात न राहता हल्ली मुक्कामी 22 किलोमीटर अंतरावर असणार्या वरोरा शहरात असल्याने गावकऱ्यांना दाखल्यावर सही घेण्यासाठी वरोरा शहर गाठावे लागते. महिन्यातून एक दोनदा ग्रामपंचायतीला भेट देऊन जातात. यानंतर ही ग्रामपंचायत कुलूप बंद असते याचा अनुभव खुद्द अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
ग्रामसेवक व सरपंच यांच्या मिलीभक्तीने तीनही गावाचा कारभार असाच सुरू आहे. त्यामुळे तिन्ही गावातील नागरिक त्रस्त झाले आहे न्याय कोणापाशी मागायचा असा प्रश्न उद्भवला आहे.
त्यामुळे मागील काही वर्षापासून गावातील समस्यांना पूर आला आहे. गावामध्ये चिखलीयुक्त रोड असल्याने दळणवळणासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.
ग्रामपंचायत मध्ये कोणतेही रेकॉर्ड ऑनलाइन नसल्याने गावकऱ्यांना दाखला मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.
नालीचे चुकीचे बांधकाम केल्याने हे सर्व पाणी मंदिराच्या आवारात जमा होते . जवळच असलेले अंगणवाडीतील लहान मुले या पाण्यामध्ये खेळतात त्यामुळे गंभीर आजाराची समस्या उद्भवण्याचा धोका आहे. गावामध्ये त्या संबंधात कोणतीही खबरदारी आतापर्यंत घेण्यात आलेली नसल्याचे मत महेश लोनकर यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हा परिषद शाळेमधील इमारत जीर्ण झाली असून विद्यार्थ्यांचा कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी जिल्ह्यातील नामांकित पत्रकार ,धुरंधर राजकारणी मान्यवर गावाला लाभलेले आहे. तरी मात्र या गावाची साधी समस्या सुद्धा अधिकाऱ्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली.
सुमठाणा हे गाव पुनर्वसित गाव असल्याने ज्या सोयी आतापर्यंत व्हायला पाहिजे त्या झाल्या नाहीत. या गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही.
अशा बऱ्याच कारणामुळे या गावातील नागरिक त्रस्त झाले असून सरपंच आणि सचिव यांच्या उदासीन धोरणामुळे गट ग्रामपंचायत मधील तिनही गावांना बऱ्याच वर्षापासून त्रास सहन करावा लागत आहे.
निवेदन देऊन सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्याने लक्ष न दिल्याने आता नागरिकांनी जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Comments
Post a Comment