घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* 

 *शिवसेना (उद्धव  बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह* 

भद्रावती : 
गद्दार स्वार्थापोटी शिवसेनेतून बाहेर पडले. परंतु पक्षाचे खरी ताकद असलेले शिवसैनिक मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. यामुळेच शिवसेना संपविण्याचे विरोधकांचे स्वप्न भंग झाले. भगवा सप्ताहाच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख वं. बाळासाहेब ठाकरे यांची अंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही संकल्पना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून घर तिथे शिवसैनिक  आणि गाव तिथे शिवसेनेची शाखा ह्या धोरणानुसार घराघरात आणि गावागावात शिवसैनिक उभा करा. असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी केले.
आज दि. ७ ऑगस्ट रोजी स्थानिक श्री मंगल कार्यालयात भगवा सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम  उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. 
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत कदम, कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे, यांच्यासह तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवा सेना विभागीय सचिव निलेश बेलखडे, विस्तारक सूर्याजी हिरकेन, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राजेश नायडू, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, आशा ताजने, सरला मालेकर , माया नारळे, , कल्पना टोंगे, खेमराज कुरेकर ,गजानन उताणे, कान्होबा तिखट, युवा सेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे, अभिजीत कुडे, राहुल मालेकर, कापटे, अभिजीत पावडे, अमोल मेश्राम आणि कॅप्टन विलास देठे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम पुढे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या भयानक संकटापासून संपूर्ण महाराष्ट्राला  वाचविले. मुंबई येथील धारावी या दाटलोक वस्तीत सुद्धा कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवल्या गेली. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. कोरोना संक्रमण कालावधी मधील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगिरी देशातील पाच मुख्यमंत्र्यांमध्ये प्रथम क्रमांकाची होती. भगवा सप्ताहाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण  विकासाकरिता घेतलेल्या कल्याणकारी निर्णयाची सर्वसामान्य जनतेला माहिती द्यावी. यातून मनापासून शिवसैनिक जोडले जातील.

*प्रत्येक शिवसैनिकांना समान न्याय व समान संधी मिळेल : रविंद्र शिंदे* 
* शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करतांना म्हटले की, जिल्हाप्रमुख म्हणून कर्तव्य पार पाडत असतांना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांना समान न्याय व समान संधी मिळावी. अशी माझी भुमिका राहील. शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीसह विविध शाखांमधील  प्रत्येक शिवसैनिक , पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात कुठलाही भेदाभेद बाळगल्या जाणार नाही.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीत प्रामाणिक शिवसैनिक निवडूण आलाच पाहीजे. या साठी पक्ष श्रेष्ठींना विश्वासात घेवून प्रत्येक पाऊल उचलून जिल्ह्यात यापुढे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष घराघरात पोहचविल्या जाईल. यासाठी सर्वांना घेवुन एकदिलाने काम करू. असे शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे याप्रसंगी म्हणाले.याप्रसंगी शिक्षक सेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डूकरे आणि युवा सेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांनी सुध्दा समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, सुत्रसंचलन सरपंच मंगेश भोयर व आभार प्रदर्शन अभिजीत कुडे यांनी केले.*

*वरोरा , बल्लापूर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्र आम्हाला मिळावे - प्रशांत कदम* 
*प्रशांत कदम यांनी असेही सांगितले की, समाजात शिवसेनेवर प्रेम करणारा फार मोठा  वर्ग आहे. शिवसैनिकांची भूमिका स्पष्ट असावी. सर्वसामान्य जनतेपर्यंत उद्धव ठाकरे यांचे विचार आणि त्यांनी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवा. असे मार्गदर्शन करताना प्रशांत कदम म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्र शिवसेना ( उ. बा. ठा. ) पक्षाच्या वाट्याला आले पाहिजे. यामध्ये वरोरा, बल्लारपूर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा समावेश असावा. महाविकास आघाडीतील जेष्ठ नेते मंडळी याचा निर्णय दिल्ली व मुंबई येथील बैठकीमध्ये घेतील. इतरांनी त्यावर बोलण्याची गरज नाही.*]

 *शिवसेना ( उ. बा. ठा. पक्षात अनेकांचा पक्षप्रवेश* 
    *भद्रावती तालुक्यातील चोरा परिसरातील वसंत बरडे, बळीराम बावणे, नामदेव शेरकुरे, तुकाराम शेरकुरे, बबन पाठक, प्रमोद गराटे आणि दीपक सावसाकडे,वरोरा (चिकनी )परिसरातील आरती  कांबळे, संगीता मेश्राम, कालींदा मारणकर, नेहा पठाण, छाया कांबळे, स्वप्ना बावने, शितल बावणे, उषा डाखरे, शितल गायकवाड व संगीता मेश्राम, तसेच दिवाकर नन्नावरे, अमोल दडमल, विनायक बोडे, राजेश्वर नन्नावरे, मारोती शेरकुरे, उमेश राठोड, शमा शेरकुरे, जनार्दन नन्नावरे, किशोर शेरकुरे, अनिल धवणे, हनुमान वनकर, सुधाकर जगजाप, प्रकाश गायकवाड, देवेंद्र रंदई, रितेश नवघरे, बंडू कुमरे, शुभम गायकवाड, नंदू गायकवाड आणि रवींद्र गायकवाड यांनी या कार्यक्रमात शिवसेना ( उ. बा. ठा ) पक्षात प्रवेश घेतला*]

*सामाजिक बांधिलकीतून मदत* 
*याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्यावतीने जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांच्या शुभहस्ते घोडपेठ येथील आई वडील नसलेल्या अनाथ वांशिक सौरभ गेडाम आणि स्वरा सौरभ गेडाम यांना शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेऊन मदत देण्यात आली. तसेच हृदयविकाराने आजारी असलेले तुळशीराम तिखट आणि रामकृष्ण वायदुडे यांचा मुलगा सर्पदंशाने मृत्युमुखी पडल्याने त्यांना सुद्धा आर्थिक सहकार्य करण्यात आले.*

Comments