अतुल कोल्हे भद्रावती :
स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त भद्रावती सराफा असोसिएशन तर्फे शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सर्वप्रथम किल्ला वार्ड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊ चॉकलेट व बिस्किट व अन्य खाऊचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश कोठारी सचिव प्रशांत यदनुरवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सराफा व्यवसायिक तसेच पदाधिकारी किशोर रोक्कमवार, शैलेश कोठारी, उमेश कूर्वे, दिवाकर नागपुरे, प्रसन्ना कोच, अनिरुद्ध लोडिया, रितेश दागी, विकास चौहान, रोकडे बंधू ,योगेश सोनी, ओंकार घोडे,सचिन माने, अनंत रो, नवीन सोनी, प्रसन्ना कोचर,अनंत रोक्कमवार तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. सोबतच भद्रावती व्यापारी असोसिएशनचे नितीन मशिदकर व बिजवे हे देखील उपस्थित होते.यापलीकडे भद्रावती सराफा असोसिएशनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक व विविध उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येईल.असे विचार भद्रावती सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेश कोठारी यांनी यावेळी व्यक्त केले.
Comments
Post a Comment