वरोरा
चेतन लुतडे
मागील बऱ्याच वर्षापासून वरोरा शहराच्या मध्यभागातून कोळसा वाहतूक केल्या जात आहे. यादरम्यान माढळी ते वरोरा महत्त्वाचा वरदळीचा रस्ता असून याच रस्त्यावरून शाळेतील मुले प्रवास करीत असतात . शाळा , कोचिंग क्लास , बाजार अशी बरीच महत्त्वाचे ठिकाण या परिसरात आहे . नागरिकांना बऱ्याच वेळा चौक ओलांडून पलीकडे यावे लागते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात नेहमी जड वाहतूक सुरू असते.
या सर्वाचा पर्याय म्हणून सद्भावना चौक परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी प्रवीण काकडे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment