वरोरा येथे तालुका डॉक्टर असोसिएशन तर्फे लाक्षणिक निषेध.कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर अतिप्रसंग व हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची मागणी.

*वरोरा येथे तालुका डॉक्टर असोसिएशन तर्फे लाक्षणिक निषेध.*

कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर अतिप्रसंग व हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची मागणी.

वरोरा 
चेतन लुतडे 

कोलकाता येथील महिला डॉक्टरांवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण भारतात पडले असून रविवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान वरोरा तालुका डॉक्टर संघटनांतर्फे या घटनेच्या निषेधार्थ काळे कपडे घालून आंबेडकर चौक येथील तलाव पाळी जवळ निषेध व्यक्त करण्यात आला. 

९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजीके मेडिकल कॉलेज मधील हॉस्पिटलमधील  ३१ वर्षीय महिला डॉक्टरची हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये अतिप्रसंग करून हत्या करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ वरोरा येथील तलाव पाळी जवळ  तालुका डॉक्टर असोसिएशन तर्फे लाक्षणिक निषेध  करण्यात आला.
आंदोलनादरम्यान उपस्थित सर्व वैद्यकीय डॉक्टरांनी we want justice चे नारे देत  मेणबत्त्या पेटवून पीडित डॉक्टर मौमिता देबनाथ यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सागर वझे यांनी देशातील डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांवर निषेध व्यक्त करीत  पीडित महिला  डॉक्टरांना योग्य न्याय देण्यासाठी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने पावले उचलावीत  अशा घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व अन्यायग्रस्त महिला डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी सरकारकडे डॉक्टर असोसिएशन ने केली आहे.

Himpam वरोरा तर्फे कोलकत्या मधील घटना घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.यामध्ये डॉक्टर राजेंद्र डावस ,डॉक्टर महानगर, डॉक्टर पेचे, डॉक्टर नितीन पाटील ,डॉक्टर वैभव काष्टी ,डॉक्टर रंजन, डॉक्टर वैद्य मॅडम ,डॉक्टर कुसुम चवले, डॉक्टर राकेश पिंपळकर , डॉक्टर चेतन रामटेके ,डॉक्टर बेदुरकर डॉक्टर जिले संघटनेतर्फे उपस्थित होते.

त्याचप्रमाणे वरोरा तालुका डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर सागर वझे, डॉक्टर हेमंत खापणे, डॉक्टर विवेक तेला, डॉक्टर नितीन देवतळे, डॉक्टर कपिल टोंगे, डॉक्टर संतोष मुळेवाळ, डॉक्टर चवले, डॉक्टर राहुल धांडे, डॉक्टर वैद्य, डॉक्टर पवन डोंगरे यांच्यासह महिला डॉक्टर सदस्य व तालुक्यातील डॉक्टर सदस्य मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले होते.
या प्रकरणात सीबीआय ने पकडलेले मुख्य आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफ टेस्ट करण्याचे ठरवले आहे.
मृतक महिला डॉक्टर यांच्या ऑटोप्सी रिपोर्ट मध्ये हैवानियत समोर आली आहे. मृतकाच्या शरीरावर 16 घाव असल्याचे निदर्शनास आले आहेत.
चीफ जस्टीस डि वाया चंद्रचूड यांच्या पिठाधीन दिनांक 20 तारखेला सुनवाई होणार आहे. रक्षाबंधन निमित्त डॉक्टर्स संघटनेतर्फे न्यायची अपेक्षा व्यक्त केली जात असून या घटनेनंतर डॉक्टरांचा रोष वाढत आहे.
-------------------------------------------


Comments