जी. प. उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत समुदाय दिवस कार्यक्रम संपन्न

जी. प. उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत समुदाय दिवस कार्यक्रम  संपन्न 

वरोरा 
      आनंदवनातील जी. प. उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण सप्ताह अंतर्गत समुदाय दिवस कार्यक्रमाचे आयोजन 28 julai 2024 ला करण्यात आले होते. 
. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रेमदास हेमणे, उपाध्यक्ष श्रीकांत बोथले केंद्रप्रमुख येनसा प्रणिता नौकरकर मॅडम, उत्कृष्ठ महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली प्रमोद नागापुरे, गणेश कळसकर या मान्यवरांची उपस्थिती होती.
.. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 पर्यंत उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये अध्ययन -अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्या ज्ञान, साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, इकोक्लब उपक्रम आदी उपक्रम गटशिक्षणाधिकारी डी. चहारे यांचे निर्देशावरून केंद्रप्रमुख प्रणिता नौकरकर यांचे सूचनेनुसार प्रभारी मुख्याध्यापक उमाटे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.उपक्रमशील कार्यक्रमात प्रेमदास हेमणे, श्रीकांत बोथले, प्रणिता नौकरकर मॅडम, प्रमोद नागापुरे या मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षण सप्ताह अंतर्गत समुदाय जीवनाचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिले. कार्यक्रमाचे शेवटी समारोपीय कार्यक्रमात समाजघटकाचे प्रवाहात येऊन सदोदित समाजकार्य करणारे प्रमोद नागापुरे यांनी स्नेहभोजनासाठी जिलेबी पुरविली.
  कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभारी मुख्याध्यापक उमाटे यांच्या सह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

Comments