तालुका कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

तालुका कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन 

मागील वर्षातील शेतकऱ्यांचा पिक विमा घेतल्याशिवाय माघार नाही.
किशोर डुकरे. 

आज चंद्रपूर येथे पालकमंत्री व कंपनी प्रशासन यांच्यात बैठक 

वरोरा 5/8/2024
चेतन लुतडे 

सन २०२३-२४ मागील वर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेत तालुक्यातील हजारो शेतकयांनी भाग घेऊन पीक विमा काढला मात्र त्या योजनेचा शेतकन्यांना पुरेसा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उभारले.

 वरोरा तालुक्यातील शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी आंदोलनाची भूमिका घेत तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात हमारी मांगे पुरी करो म्हणत आंदोलन उभारले. 
मागील वर्षी शेतकऱ्यांच्या हातात आलेले सोयाबीन पीक रोगाने, तसेच रब्बी मधील चणा, गहू या पिकाचे गारपीटमुळे नुकसान झाले होते . या संबंधात कंपनी व अधिकाऱ्यांना पंचनामे पोहोचता करण्यात आले होते. मात्र नुकसान भरपाई अजूपर्यंत मिळाली नाही. तसेच कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याबाबत सबंधित तालुक्यातील जवळपास नऊ ते दहा हजार शेतकन्यांनी पिक विमा कंपनीकडे सोयाबीन आणि कपाशीची एकाच दिवशी तक्रार केली असून त्यादिवशी पाऊस नाही हे कारण दाखवून कपाशीची तक्रार रिजेक्ट करण्यात आली, पण त्याच दिवशी तक्कार, पंचनामा झालेल्या काही शेतक-यांना कापूस या पिकाची पिक विमा रक्कम मिळाली आहे हा दुजाभाव का असा सवाल करत तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेरले.

 ज्या शेतकत्यांना सोयाबीन या पिकाला 100% पीक विमा लागू झाला अशा तालुक्यातील हजारो शेतक‌यांना अजूनही पर्यंत शिल्लक रक्कम मिळालेली नाही . या आशयाचे निवेदन तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी पोलीस अधिकारी मेश्राम यांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी किशोर डुकरे यांच्या आंदोलनात  तुकाराम निब्रड, उमेश टोंगे, राजू डुकरे, आकाश धवणे, श्रीकृष्ण देवतले, अनिरुद्ध देठे, राजू चिकटे, पुरुषोत्तम पावडे, राजू झापर्डे आदी शेतकरी उपस्थित होते.


 या निवेदनातून शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या

1) ज्या शेतक‌यांनी पीक नुकसानीची ऑनलाईन तक्रार केली होती मात्र ती तक्रार पीक विमा कंपनीने जाणून बुजून रिजेक्ट केली अशा शेतकऱ्यांना ती तक्रार घेऊन पीक विमाचा 100% लाभ देण्याबाबत.

2) पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे नसेल तर आत्महत्या करायची परवानगी देऊन पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याबाबत.

3) ज्या शेतकत्यांना सोयाबीन या पिकाचा विमा लागू झाला अशा शेतकऱ्यांना ती रक्कम येत्या आठ दिवसात देण्याबाबत.

4) रब्बी हंगामाप्त तालुक्यातील अनेक शेतकयांचे गारपीटीने, चना व गहू पिकाचे नुकसान झाले पंचनामे सुद्धा झाले परंतु त्यांनाही अजून भरपाही मिळाली नाही त्यांचे नुकसान भरपाई त्वरित निकाली काढण्याबाबत.

5) काही शेतकत्यांना पीक विमा नुकसान भरपाई फक्त 55.75 पैसे अशी अल्प रक्कम देण्यात आली असून शेतकऱ्यांची अशी  थट्टा कंपनीने करणे योग्य नसून याबाबतचा ताबडतोब निर्णय घेण्यात आला.

आज सोमवार पालकमंत्री आणि कंपनी अधिकारी व प्रशासन यांच्यात बैठक ठरली असून या बैठकीमध्ये जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका किशोर डुकरे आणि त्यांच्या शेतकऱ्यांनी घेतली आहे.





Comments