एक संध्याकाळ जेष्ठांसोबत या मनोरंजनात्मक कार्यक्रमात विविध कलागुणांचे सादरीकरण

एक संध्याकाळ जेष्ठांसोबत या मनोरंजनात्मक कार्यक्रमात विविध कलागुणांचे सादरीकरण 


अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर:जेष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व जेष्ठ नागरीक संघ, रामनगर चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने शहरातील जेष्ठा नागरिकांकरीता मनोरंजनात्मक कार्येक्रम येथे आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ महिला व पुरूषांनी हिरीरिने सहभाग घेवून गीत, गायन, नृत्य, लावणी, जादूचे प्रयाेग आदी कलागुणांचे सादरिकरण करून उपस्थित श्रोत्यांचे मनोरंजन केले.
एकदा व्यक्ती जेष्ठ झाली की त्यांना विरंगुळा व मनोरंजनाचे क्षण फारसे मिळत नाही. नेमकी हिच बाब  बाब लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने स ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने जेष्ठ नागरिकांकरीता रामनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे सभागृहात मनोरंजनाचा कार्यक्रम शुक्रवार ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित केला गेला. या 
 कार्यक्रमात चंद्रपुरातील ज्येष्ठ महिला व पुरूषांनी सहभाग नोंदवित विविध प्रकारच्या मनोरंजनात सहभाग दर्शविला. या कार्यक्रमात कमीत कमी ३० ते ४० जेष्ठांनी सहभाग नोंदविला. तथा कार्यक्रमात जेष्ठ नागरिक व महिलांनी वेगवेगळ्या प्रकारची गीत, गायण, नृत्य, लावणी, जादूचे प्रयोग तथा आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळवून देत मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरिकरण केले. कार्यक्रमात सहभागी ज्येष्ठांचा उत्साह बघता इतर अनेक जेष्ठांनी अगदी वेळेवर देखील सादरीकरण केले. 
या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अजय पालारपवार यांनी प्रास्ताविक भाषणात भविष्यातही ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविण्याचे अभिवचन दिले. चंद्रपुरातील नामवंत हृदयरोग तज्ञ डॉ अशोक वासलवार यांनी ज्येष्ठांना त्यांच्या शरीर स्वास्था बद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमला गाजरलावार हिने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात प्रेक्षकांमध्ये जावून त्यांचेशी हितगुज करून प्रत्येकांना बोलते करून केले. या कार्यक्रमात रोटरी क्लबचे सदस्य अशोक हासाणी, रविंद्र जैन, अरुण तिखे, राजेश गण्यारपवार, मनिष बोराडे, संतोष तेलंग, अभय झाडे तसेच सौ. वसुधा बोडखे, सौ. अर्चना पालारपवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी सर्व सहभागी कलाकारांना बक्षीसे वितरित करण्यात आली. त्यानंतर रोटरी क्लबचे सचिव मिलिंद बोडखे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक व रोटरी क्लबचे सदस्य यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.सदर कार्यक्रमाच्या आयोजनात जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव पिंपळकर व सचिव गहूकार यांनी मोलाचे मदत केली असे रोटरीचे सचिव मिलिंद बोडखे कळवितात.

Comments