उमेद अभियानाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना एक लाख राख्या घेऊन महिला झाल्या रवाना मुंबई कडे...

उमेद अभियानाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना एक लाख राख्या घेऊन महिला झाल्या रवाना मुंबई कडे...

# महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू केल्याने व्यक्त केली कृतज्ञता
# शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते व इतर पदाधिकारी यांनी केले स्वागत व अभिनंदन !

अरुण चौधरी 
फक्त बातमी १८/८/२०२४

वरोरा  दि. १८  – राज्य शासनाने वतीने महिला सक्षमीकरण साठी टाकलेले एक पाऊल म्हणजे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान होय.उमेद अभियानाचे बळकटीकरण व महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या.प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली आहे. या योजनेचा पाहिल्या दोन महिन्यांचा लाभ राज्यातील पात्र महिलांना डिबीटीद्वारे नुकताच वितरीत करण्यात आला. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. यामुळे राज्यभरातून बचतगट चळवळीतील उमेद अभियानातील महिला कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक कोटी राख्या घेऊन जात आहेत.

              शासनाने आणलेल्या नवीन योजनांमुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्यातील बचत गटाच्या महिलांनी राखी तयार केल्या आहे. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांना राख्या बांधल्या जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून १९ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी 'चलो मुंबई' असा नारा देत चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १५ महिला व संघटनेचे प्रतिनिधी मुंबईसाठी आज रवाना झालेले आहे. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर जाऊन 'उमेद' संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना राखी बांधली जाणार असल्याची माहिती 'उमेद' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

                  शासनाने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.महिलांना ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी महिलांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांत अधिक योजना आणत आहेत. मुख्यमंत्री हे आपले मोठे भाऊ आहेत, अशी भावना राज्यातील महिलांमध्ये निर्माण झाली आहे.
                  चंद्रपूर जिल्ह्यात २० हजार महिला बचत गट असून या समूहात २ लाख महिला सहभागी आहेत. या दोन लाख महिलांच्या वतीने प्रत्येक तालुक्यातून एक महिला याप्रमाणे १५ महिला एक लाख राख्या घेऊन मुंबईला निघाल्या आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.नितीन मत्ते यांनी वरोरा येथील आनंदवन चौकात सर्व महिला आणि संघटनेचे जंगी स्वागत व अभिनंदन केले. महिलांनी स्वतः राख्या तयार करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्यासाठी जात असल्याबाबत शुभेच्छा दिल्या, मिठाई वाटप करून आनंदही व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्याकडून राख्या व मिठाई सुद्धा सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी उमेद महिला व कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण भांडारकर, अरुण चौधरी, हेमचंद बोरकर,संगीता शिंदे,ज्योती साळवे उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यातून मुंबई साठी रवाना झालेल्या महिलांमध्ये विजया रामकृष्ण ठोंबरे नागभिड, सुचिता गणेश बोर्डे कोरपना , शीला दिलीप जाधव राजुरा,रंजना पवन सोनटक्के मुल ,लता नवनाथ राकडे ब्रम्हपुरी, सुनीता विकास शेंडे , अनिता प्रदीप चिताडे चंद्रपूर, मनश्री गजानन राणे सिंदेवाही, सविता अंकुश चौधरी ,पुष्पा किशोर ठाकरे वरोरा, सुवर्णा प्रशांत वासाडे बल्लारपुर, सीमा प्रवीण खुटेमाटे भद्रावती ,दिशा प्रमोद कोयचाडे चिमूर आणि स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रपूर येथे सुद्धा शिवसेना पदाधिकारी यांनी उमेद संघटनेचे स्वागत व कौतुक केले .



Comments