*भद्रावती येथील विविध कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

*भद्रावती येथील विविध कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

अतुल कोल्हे भद्रावती :-

            भद्रावती तहसील कार्यालयासह शहरातील अन्य कार्यालयात देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध शहरातील विविध शासकीय कार्यालय तथा निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. शहरातील तहसील कार्यालयात सकाळी नऊ वाजता प्रभारी तहसीलदार सुधीर खांडरे यांच्या हस्ते तिरंगा फडविण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. नगरपरिषद कार्यालयात सकाळी साडेसात वाजता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी  यांच्या हस्ते तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.सेवादल मैदानात 75 फूट उंचीच्या तिरंग्याचे नगरपरिषद कर्मचारी दुर्योधन गाऊत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भद्रावती पंचायत समिती कार्यालयात सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर हुतात्मा स्मारक येथे नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी जगदीश गायकवाड यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Comments