*वरोरा -भद्रावती तालुका व शहर महिला आघाडी व युवतीसेना तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासात संपन्न.* *लाडक्या बहिणीने शिवसैनिकांना बांधले बंधन.*

*वरोरा -भद्रावती तालुका व शहर महिला आघाडी व युवतीसेना तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासात संपन्न.*

 *लाडक्या बहिणीने शिवसैनिकांना बांधले बंधन.* 

 *वरोरा -भद्रावती* 
     चेतन लुतडे 
वरोरा- भद्रावती विधानसभा अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राखी पौर्णिमा सणानिमित्त रक्षाबंधनाचा कार्यक्रम वरोरा व भद्रावती  येथील शिवसेना कार्यालयात मोठ्या उत्साहात घेण्यात आला. भद्रावती येथील माजी नगरसेविका प्रणिताताई शेंडे यांनी जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांना राखी बांधून या उत्सवाची सुरुवात केली. यानंतर भद्रावती कार्यालयात महिला शिवसैनिकांनी भव्य मेळाव्याचे आयोजन करीत जिल्हाप्रमुखांना राख्या बांधल्या .  विविध क्षेत्रात काम करणारे शिवसैनिक व समाजिक कार्यकर्ते यांना राख्या बांधून बहिणीचे रक्षण करण्याचे वचन घेतले. 
वरोरा येथील शिवालय कार्यालयात नर्मदाताई पेंदोर , आश्लेषा जीवतोडे, वर्षाताई कुरेकार, व महिला आघाडी पदाधिकारी यांनी जिल्हाप्रमुखासह शिवसेना पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. दरवर्षी हा कार्यक्रम  आयोजित करण्यात येतो. शिवसैनिकांनी लाडक्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देत बहिणीचे तोंड गोड केले. यानंतर पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना राख्या बांधून लाडक्या बहिणींचे रक्षण करण्याचे बंधन पोलिसांनी बांधून घेतले. यावेळेस शहरातील शेकडो लाडक्या बहिणींनी जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे सह शिवसैनिकांना  राख्या बांधून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. 

या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे, दत्ता बोरेकर, खेमराज कुरेकार, नर्मदाताई पेंदोर,आश्लेषा जीवतोडे,प्रशात कारेकर,ज्ञानेश्वर डुकरे, अरुण घुगुल, सुधाकर कुलथे, शरद पुरी , आगलावे ताई आशाताई ताजणे, वर्षाताई ठाकरे, भावनाताई खोब्रागडे सरलाताई मालेकर यांच्यासह अनेक पदअधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Comments